Crime News: महिलेला 'F**k Off' म्हणणं तरुणाला पडलं महागात; न्यायालयाने...

Court Order
Court Order
Updated on

नवी दिल्ली - एका महिलेला धमकावण्यासाठी इंग्रजी अपशब्दांचा वापर केल्याबद्दल एका युवकावर लैंगिक छळाचा आरोप निश्चित करण्याचा दंडाधिकारी न्यायालयाचा आदेश दिल्लीच्या एका न्यायालयाने कायम ठेवला आहे.

Court Order
Andheri East Bypoll Election: भाजपची खेळी यशस्वी? अंधेरी पोटनिवडणुकीत अनेकांची नोटाला पसंती

न्यायालयाने म्हटलं की, याचिकाकर्त्याने तक्रारदाराचा अपमान करण्याच्या उद्देशाने F**K Off हा शब्द वापरल्याचा प्रथमदर्शनी खटला आहे. ऑगस्ट 2022 मध्ये महिला न्यायालयाने कलम 354 अ (लैंगिक छळ आणि शिक्षा) 509 अंतर्गत आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले होते. याचिकाकर्त्याने दाखल केलेल्या फौजदारी पुननिरीक्षण प्रकरणात न्यायालयात सुनवाणी सुरू होती.

Court Order
Eknath Shinde: शिंदे सरकारचा महत्वाचा निर्णय; लवकरच नोंदणीकृत कामगारांना घरकुल मिळणार

अतिरिक्त सत्र न्यायाधीश संजय शर्मा यांनी दिलेल्या आदेशात म्हटले की, तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, आरोपीने 9 मे 2019 रोजी अपमानास्पद "F **K* Off" चा वापर केला. तसेच तक्रारदार महिलेला धमकावले. या न्यायालयाला दंडाधिकारी न्यायालयाने केलेल्या आरोप निश्चितीत काहीही बेकायदेशीर, अनियमित किंवा अधिकाराचा गैरवापर केल्याचं आढळलं नाही. त्यानुसार, याचिकाकर्त्याने दाखल केलेली फौजदारी पुनरीक्षण याचिका फेटाळली जात असल्याचं न्यायाधीश संजय शर्मा यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.