Delhi Crime: दिल्ली पुन्हा हादरली! कानशिलात लगावल्याचा बदला घेण्यासाठी अल्पवयीन मुलाची चौघांकडून हत्या

दिल्ली शहर देशाचीच नव्हे तर गुन्ह्यांची देखील राजधानी आहे.
Delhi Crime
Delhi Crimeesakal
Updated on

नवी दिल्ली : दिल्ली शहर देशाची राजधानीच नव्हे तर गुन्ह्यांची देखील राजधानी आहे. अनेक काळापासून इथं अत्यंत हिणकस स्वरुपाचे गुन्हे घडले आहेत. त्यात आज पुन्हा एकदा एका अल्पवयीन मुलाची चौघा तरुणांनी निर्घृणपणे धारदार शस्त्रानं भोसकून हत्या केल्याची घटना घडली आहे. यातील सर्व आरोपी १८ ते २१ वयोगटातील आहेत. (Delhi Crime a minor boy was killed by four to take revenge for slapping)

Delhi Crime
Uttarkashi Tunnel Rescue: बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या चाचण्या पूर्ण; बहुतांश फिट पण...

पोलिसांच्या माहितीनुसार, दक्षिण दिल्लीच्या आंबेडकरनगर भागात दिवाळीच्या दिवशी मारलेल्या एका थप्पडेचा बदला घेण्यासाठी दोन तरुणांनी आपल्या दोन मित्रांच्या मदतीनं एका अल्पवयीन मुलाची निर्घृणपणे हत्या केली. (Marathi Tajya Batmya)

शिनाख्त पीयूष (वय १७) असं या मुलाचं नाव आहे. पीयूषचा भुपेंद्र ऊर्फ बुची या मुलासोबत वाद झाल्यानं त्यानं दोघांच्या कानशिलात लागवली होती. याचा बदला घेण्यासाठी ज्या चौघांनी याची हत्या केली. त्या भुपेंद्र ऊर्फ बुची (वय २२), वरुण (१८), तुषार (१८) आणि विनय (२१) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींकडून गुन्हा केल्याचा चाकूही जप्त करण्यात आला आहे.

Delhi Crime
2018 मध्ये एक्झिट पोल किती खरे ठरले होते?

नेमकं काय घडलं?

पोलिसांच्या माहितीनुसार, पीयूष आपल्या आई आणि बहिणीसोबत देवली भागात राहत होता. त्याची आई छोटीमोठी काम करुन कुटुंबाचं गुजरान करत होती. तर पीयूष ११ वीनंतर दोन वर्षांपासून शाळा सोडली होती. पूर्वी तो मदनगीर भागात राहत होता त्यामुळं त्याचे मित्र त्या भागात होते तर तो मित्रांना भेटायला जात असे. (Latest Marathi News)

Delhi Crime
Mega Defense Deal : भारताला मिळणार 97 फायटर जेट्स अन् 156 हेलिकॉप्टर्स; केंद्रानं दिली 'मेगा डील'ला मंजुरी

बुधवारी पीयूष त्याच भागात आला होता तर त्याला आरोपी मुलांनी घेरलं आणि रात्री पावणे आठ वाजता त्याच्यावर चाकूनं वार केला. त्यानंतर जीव वाचवण्यासाठी तो एका हॉटेलमध्ये शिरला पण आरोपींनी आत घुसून त्याच्यावर हल्ला चढवला. जीवघेणा हल्ला करुन सर्वजण फरार झाले. त्यानंतर पोलिसांनी जखमी अवस्थेत पीयूषला रुग्णालयात दाखल केलं पण पीयूषच्या शरिरावर ६ घाव केल्यानं त्याचा काही वेळातच मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.