Delhi Crime: दिल्ली पुन्हा हादरली! लग्नाला नकार दिला म्हणून लोखंडी रॉड डोक्यात घालून विद्यार्थीनीचा खून

गेल्या काही दिवसांपासून देशाच्या राजधानीत तरुणींवर तीव्र स्वरुपाचे हल्ल्यांच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.
Murder
Murder sakal
Updated on

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशाच्या राजधानीत तरुणींवर तीव्र स्वरुपाचे हल्ल्यांच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यामध्ये आजच्या एका घटनेनं भर पडली आहे. दिल्लीतील कमला नेहरु कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थीनीनं लग्नाला नकार दिल्यानं तिच्या डोक्यात लोखंडी रॉड जोरदार प्रहार करण्यात आला. यामध्ये तीव्र हल्ल्यात तीचा मृत्यू झाला. (Delhi Crime again refusing to marry a girl student was killed by hitting an iron rod on head)

Murder
Rahul Kul: राहुल कुल यांना क्लीनचीट, राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल; म्हणाले, दौंड कार्टानं...

पोलिसांच्या माहितीनुसार, नर्गिस असं हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या विद्यार्थीनीचं नाव आहे. याप्रकरणी तिच्या नात्यातला २८ वर्षीय मुलगा इरफान याला पोलिसांनी अटक केली आहे. नर्गिसनं इरफानशी लग्न करण्यास नकार दिल्यानं इरफानन तिच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून तिचा जीव घेतला.

प्राथमिक माहितीनुसार, नर्गिसचे कुटुंबीय तिचं लग्न इरफानसोबत जमवण्यास उत्सुक नव्हते. कारण इरफानला चांगली नोकरी नव्हती. तो स्विग्गी या फुड डिलिव्हरी अॅपसाठी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. (Marathi Tajya Batmya)

नर्गिसनं आपल्याशी बोलणं बंद केल्यानं इरफान नाराज होता. त्याला माहिती होतं की, नर्गिस मालवीय नगरमध्ये दररोज क्लाससाठी जाते. तसेच या मार्गावरील बागेजवळून ती जात असताना दुपारी १२ वाजता त्यानं तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला.

यावेळी तिनं त्याच्याशी बोलण्यास नकार दिला. यानंतर त्यानं आपल्यासोबत असलेला लोखंडी रॉड तिच्या डोक्यात घातला. यामध्ये गंभीर दुखापत झाल्यानं तिचा मृत्यू झाला. इरफान नर्गिसला जीवे मारण्याचा गेल्या तीन दिवसांपासून प्रयत्न करत होता, असं त्यानं पोलिसांशी बोलताना सांगितलं. (Latest Marathi News)

याप्रकरणी दिल्लीच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांनी याप्रकरणी ट्विट करत संताप व्यक्त केला. त्यांनी म्हटलं की, दिल्लीत एका महिलेला तिच्या घराबाहेर गोळी घालून हत्या करण्यात आली. तर मालवीय नगर सारख्या हायफाय एरियात एखाद्या मुलीला रॉडनं मारलं जातं. वृत्तपत्रांमध्ये मुलींची नाव बदलतात. पण गुन्हे थांबत नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.