Delhi Crime: शालेय विद्यार्थ्यांवर वर्गातील मुलांकडूनच सामुहिक अत्याचार; शिक्षकांकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

देशाची राजधानी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा भयानक घटना समोर आली आहे.
school
schoolschool
Updated on

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा भयानक घटना समोर आली आहे. यामध्ये १२ आणि १३ वर्षांच्या दोन शालेय विद्यार्थ्यांवर त्यांच्याच वर्गातील मुलांनी सामुहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. यामुळं दिल्ली पुन्हा एकदा हादरली आहे. दिल्ली पोलिसांनी सोमवारी याबाबत माहिती दिली आहे. (Delhi Crime gang rape of school students by classmates teacher asked to be quiet)

school
Article 370: ...म्हणून जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवलं; केंद्राचा सुप्रीम कोर्टात अजब दावा

पोलिसांचं म्हणणं काय?

याच वर्षी एप्रिल महिन्यात हा प्रकार घडला असून ईशान्य दिल्लीतील एका सरकारी शाळेतील एका समर कॅम्पदरम्यान हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी १२ आणि १३ वर्षांच्या दोन मुलांनी आपल्यावर वर्गातील पाच ते सहा विद्यार्थ्यांनी लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली आहे. (Latest Marathi News)

याप्रकरणी दोन स्वंतत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून यातील सर्व आरोपी हे अल्पवयीन आहेत. या ओरीपांना बाल कल्याण समितीसमोर दाखल करण्यात आलं आहे. त्याचबरोबर दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक नेमलं आहे.

school
Nashik Crime: शालेय विद्यार्थ्यांवर प्राणघातक हल्ला

नेमकं काय घडलंय?

रोहिणी येथील सरकारी शाळेतील १३ वर्षांच्या विद्यार्थ्याला समर कॅम्प दरम्यान, वर्गातील इतर पाच ते सहा विद्यार्थी कॅम्पजवळच्या एका बागेत घेऊन गेले आणि त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला, सलग सात दिवस हा अत्याचार केला गेल्याचं विद्यार्थ्यानं पोलिसांमध्ये नोंदवलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. (Marathi Tajya Batmya)

school
Rohit Sharma : रोहितची कॅप्टन्सी, चौथ्या क्रमांकावर कोण... गावसकरांच्या मते टीम इंडियासमोर वेगळीच समस्या

वाच्यता न करण्याची शिक्षकांची तंबी

या घटनेनंतरची धक्कादायक बाब म्हणाले, या भयानक घटनेनंतर संबंधित विद्यार्थ्याला या घटनेची कुठेही वाच्यता न करण्याची धमकी शिक्षकांकडूनच देण्यात आली. काही दिवसांनंतर या विद्यार्थ्यानं आपल्या दोन शिक्षकांनी आपल्याला कुठेही न बोलण्याचं सांगितल होतं असा खुलासा केला. त्यानंतर या मुलाच्या पालकांनी पीसीआर कॉल केला आणि त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

यानंतर आणखी एका १२ वर्षाच्या मुलावरही अशाच प्रकारे अत्याचार झाल्याची बाब समोर आली. या विद्यार्थ्यावर शाळेच्या स्वच्छतागृहात सामुहिक अत्याचार करण्यात आला. या मुलाला देखील आरोपी विद्यार्थ्यांनी कुठेही याची वाच्यता न करण्याची धमकी दिली होती. या घटनेनंतर पंधरा दिवसांनंतर या आरोपी विद्यार्थ्यांनी या मुलावर पुन्हा स्वच्छतागृहात असाच प्रकार करण्याचा प्रयत्न केल्याचंही समोर आलं आहे.

school
Imran Khan: इम्रान खान यांना मोठा दिलासा! तोशाखाना प्रकरणात सुनावलेल्या शिक्षेला हायकोर्टाने दिली स्थगिती

दिल्ली सरकारनं काय म्हटलंय?

हा धक्कादायक प्रकार असून या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. जर कुठल्या शिक्षकाला किंवा कर्मचाऱ्याला याची माहिती असेल आणि त्यांनी वरिष्ठांना याबाबत कळवण्यात टाळाटाळ केली असेल तर त्यांच्यावरही कडक कारवाई करण्यात येईल. (Marathi Tajya Batmya)

school
Nawab Malik : नवाब मलिकांना कोर्टाचा आणखी एक दिलासा; हमीदार सादर करण्यास मुदतवाढ

भाजपची 'आतिशी' यांच्या राजीनाम्याची मागणी

दरम्यान, विरोधक असलेल्या भाजपच्या नेत्यांनी या प्रकरणानंतर शिक्षण मंत्री अतिशी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच देशाच्या राजधानीत आपच्या सत्ताकाळात शाळांची स्थिती अतिशय रसातळाला गेली आहे, असा आरोपही केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.