Delhi Excise Policy Case : केजरीवालांना अटक झाल्यास पुढे काय? नेत्याने सांगितला 'आप'चा प्लॅन बी

याआधी सुप्रीम कोर्टाने आप नेते मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पक्षाला मोठा धक्का बसला आहे
arvind kejriwal
arvind kejriwal
Updated on

दिल्लीचे मंत्री आप नेते सौरभ भारद्वाज यांनी मनीष सिसोदीया यांना जामीन नाकारला जाणं आणि ईडीकडून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना समन्स पाठवणं हे फक्त राजकीयदृष्ट्या फसवण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.

एनडीटीव्हीने दिलेल्या रिपोर्टनुसार, भारद्वाज म्हणाले की आपपासून राजकीयदृष्ट्या मुक्तता मिळवण्यासाठी हे घडत आहे. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेबाबत पक्षाकडे काही प्लॅन बी आहे का, यावर ते म्हणाले, मला अद्याप माहिती नाही आणि त्याबद्दल कोणतीही चर्चा झाली आहे असे मला वाटत नाही. केजरीवाल आमचे नेते आहेत आणि आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू.

सुप्रीम कोर्टाने दिल्ली अबकारी धोरण घोटाळा प्रकरणात आप नेते मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पक्षाला मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर काही तासांनी ईडीने अरविंद केजरीवाल यांना ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले. त्यांना २ नोव्हेंबर रोजी दिल्ली कार्यालयात बोलावण्यात आले आहे.

arvind kejriwal
Maratha Reservation: नवले पुलावरील जाळपोळ प्रकरणी पुणे पोलिसांची मोठी कारवाई; 400 ते 500 जणांवर गुन्हे दाखल

या प्रकरणी सौरभ भारद्वाज म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांची चौकशी होईल, अशी अपेक्षा आधीपासूनच होती. दोन दिवसांपूर्वी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत भाजप नेते मनोज तिवारी म्हणाले होते की, पुढील क्रमांक अरविंद केजरीवाल यांचा असेल आणि त्यांना अटक केली जाईल. मला आश्चर्य वाटते की केजरीवाल यांना बोलावले जाईल हे मनोज तिवारी यांना कसे कळले? यावरून मला खात्री पटली की ही एक राजकीय स्क्रिप्ट आहे.

arvind kejriwal
Maratha Reservation: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आजपासून 15 नोव्हेंबरपर्यंत जमावबंदी आदेश लागू

अनेक पर्यायांवर चर्चा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गुरुवारी (२ नोव्हेंबर) ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी गेले, तेव्हा त्यांना अटक केली जाऊ शकते का? अरविंद केजरीवाल यांना चौकशीच्या निमित्ताने अटक करण्याची तयारी सुरू असल्याचे पक्षाचे नेते सांगत आहेत. काल आपच्या नेत्या अतिशी यांनी देखील दोन नोव्हेंबर रोजी केजरिवाल यांना अटक होऊ शकते अशी भीती व्यक्त केली. दरम्यान मीडिया रिपोर्ट्सनुसार सीएम केजरीवाल संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन अनेक पर्यायांवर चर्चा करत असल्याचे समोर आले आहे.

'आप'चे नेते गोपाल राय यांनाही हा प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर दिले की, स्वातंत्र्यलढ्यात अनेक नेते आत गेले होते, पण लढा थांबला नाही आणि हुकूमशहा सर्वांना तुरुंगात टाकत असेल तर त्याचा अर्थ असा आहे, हुकूमशहा संपणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.