Delhi Farmers protest: दिल्ली सीमेवरील बॅरिकेड्स ३७ दिवसांनी हटवले; लाखोंना मिळणार वाहतूक कोंडीतून दिलासा; शेतकऱ्यांचा संप अद्याप सुरूच

Delhi Police starts removing barricades: दिल्ली-एनसीआरमधील लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दिल्ली पोलिसांनी मंगळवारी ३७ व्या दिवशी दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवे, सिंघू आणि टिकरी सीमेवर लावलेले बॅरिकेड्स हटवले.
Delhi Police starts removing barricades
Delhi Police starts removing barricadesEsakal
Updated on

Delhi Police starts removing barricades: दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू असताना अनेक सीमा बंद असतानाच दिल्ली-एनसीआरमधील नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. शेतकऱ्यांचा दिल्लीकडे मोर्चा पाहता सीमेवर लावण्यात आलेले बॅरिकेड्स हटवण्यास सुरुवात झाली आहे. दिल्ली पोलिसांनी काल (मंगळवारी) ३७ व्या दिवशी दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवे, सिंघू आणि टिकरी सीमेवर लावलेले बॅरिकेड्स हटवले. त्याचबरोबर लावलेले सिमेंटचे बॅरिकेड्स हटवण्याचे कामही सुरू झाले आहे. दिल्ली-मेरठ द्रुतगती मार्ग (DME) आणि NH-9 वर लावलेले बॅरिकेड्स हटवण्याबरोबरच सर्व्हिस लेनवरील सिमेंट भिंत पाडण्याचे कामही रात्री उशिरा सुरू करण्यात आले.

बुधवारी सकाळपर्यंत रस्ता मोकळा होणे अपेक्षित होते. यामुळे दिल्ली, गाझियाबाद आणि नोएडासह मेरठच्या लाखो वाहन चालकांना दिलासा मिळणार आहे. दिल्ली पोलिसांसोबतच गाझियाबाद पोलिसांनीही बहुतांश जवानांना यूपी गेटमधून हटवले. रात्री उशिरा येथे मोजकेच पोलिस दिसून आले.

यूपी गेटवरील सर्व्हिस लेन १२ फेब्रुवारीला केली होती बंद

शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी १२ फेब्रुवारी रोजी यूपी गेटवरील सर्व्हिस लेन पूर्णपणे बंद केली होती. सिमेंटचे बॅरिकेड टाकून भिंत उभारून त्यावर काटेरी ताराही टाकण्यात आल्या होत्या. जवळच खूप खोल खड्डा खणला होता. तसेच डीएमई आणि एनएच-9 वर दीड ते दोन लेन अडवून बॅरिकेड्स लावण्यात आले होते. पोलिसांची वाहने, कंटेनर आदींच्या वर तंबू टाकून नियंत्रण कक्ष तयार करण्यात आला.त्यानंतर यूपी गेटवर वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. मंगळवारी सायंकाळी बॅरिकेड्स हटवण्यात आले असून रात्री उशिरा सिमेंटची भिंत पाडण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे.

Delhi Police starts removing barricades
Mallikarjun Kharge : भाजपची स्थिती ‘शायनिंग इंडिया’सारखी होईल; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा दावा

सर्व्हिस रोडचा खुला झाल्याने कौशांबी आणि वैशाली येथील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यूपी गेटपासून मोहन नगरच्या दिशेने जाणाऱ्यांनाही याचा लाभ मिळेल. रस्ता बंद झाल्यामुळे लोकांना सूर्यानगर, महाराजपूर, जीटी रोडवरून जावे लागत आहे. डीसीपी ट्रान्स हिंडन निमिष पाटील म्हणाले की, दिल्ली पोलिसांनी बॅरिकेड्स हटवण्यास सुरुवात केली आहे. पीएसी आधीच हटवण्यात आली असून आता काही पोलीस रस्ता मोकळा होईपर्यंत लक्ष ठेवणार आहेत.

उड्डाणपूल अजूनही बंद

दिल्लीच्या सिंघू बॉर्डर आणि टिकरी बॉर्डरवर लावण्यात आलेले बॅरिकेड्सही पोलिसांनी हटवले आहेत. सिंघू हद्दीतील उड्डाणपूल मात्र बंदच आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांनी १३ फेब्रुवारीला दिल्ली मोर्चाची घोषणा केली होती. त्यामुळे हरियाणाला लागून असलेल्या दिल्लीच्या दोन सीमा १० फेब्रुवारीपासून पूर्णपणे बंद करण्यात आल्या होत्या. याठिकाणी केवळ सिमेंट काँक्रीटचे बॅरिकेड्स बसवले नाहीत तर पोलिसांनी बॅरिकेड्स लावून रस्तेही बंद केले आहेत.

Delhi Police starts removing barricades
Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकांत आतापर्यंत किती उमेदवारांचं झालं 'डिपॉझिट जप्त'; निवडणूक आयोगानं जाहीर केली धक्कादायक आकडेवारी

शेतकरी आपल्या मागण्यांबाबत सध्या शंभू सीमेवर ठाण मांडून

पंजाब आणि हरियाणाच्या शंभू सीमेवर सध्या मोठ्या प्रमाणात शेतकरी ठाण मांडून आहेत. त्यामुळे तेथे पोलिसही तैनात आहेत. 23 मार्च रोजी मोठा कार्यक्रम आयोजित करण्याच्या तयारीत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत ते मागे हटणार नाहीत. संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चाच्या आवाहनावर अस्थी कलश यात्रा काढण्यात येत आहे. मंगळवारपासून ही यात्रा यमुनानगर, कुरुक्षेत्र, कर्नाल, कैथल येथे 2 दिवस चालणार आहे.

Delhi Police starts removing barricades
Warmest Year: पृथ्वी नामशेष होण्याच्या मार्गावर...2014-2023 आत्तापर्यंतचे सर्वात उष्ण दशक, WMO चा धक्कादायक अहवाल समोर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.