Delhi Budget:'आप'लाही प्रभू रामाचा आधार! दिल्ली सरकारचा आजचा अर्थसंकल्प आहे खास

Delhi Budget 2024-25: दिल्ली सरकार आज आपला दहावा अर्थसंकल्प सादर करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आम आदमी पक्षाचा हा अर्थसंकल्प रामराज्य थीमवर आधारित असणार आहे
atishi and arvind kejariwal
atishi and arvind kejariwalesakal
Updated on

नवी दिल्ली- दिल्ली सरकार आज आपला दहावा अर्थसंकल्प सादर करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आम आदमी पक्षाचा हा अर्थसंकल्प रामराज्य थीमवर आधारित असणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या आधी आप देखील प्रभू रामाची मदत घेतल असल्याची चर्चा सुरु झाली आहे. (Delhi Finance Minister Atishi will present the 10th budget of AAP Ram Rajya to be the theme of govt )

एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने यासंदर्भातील माहिती दिली आहे. दिल्लीच्या अर्थमंत्री आतिशी या अर्थसंकल्प (Delhi Budget 2024-25) विधिमंडळात सादर करतील. त्यांच्या अर्थसंकल्पात रामराज्याची थीम दिसून येईल. निवडणुका असल्याने अशा प्रकारचा निर्णय घेतला गेला असल्याची चर्चा आहे. अर्थसंकल्पात सर्व वर्गासाठी काहीनाकाही घोषणा होण्याची शक्यता आहे.

atishi and arvind kejariwal
India Aghadi : 'इंडिया आघाडी'च्या धास्तीने भाजपकडून अरविंद केजरीवाल यांच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू

आप सरकार सलग दहाव्यांदा आज अर्थसंकल्प मांडत आहे. अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी यासंदर्भात मोठ्या प्रमाणात तयारी केल्याचं समजतंय. दिल्लीच्या जनतेसाठी अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या जाण्याची शक्यता आहे. पायाभूत सुविधांवर आप सरकारचा भर असणार आहे.

सोसायटीमधील विकास कामांवर दिल्ली सरकार खर्च वाढवेल अशी शक्यता आहे. तसेच पिण्याचे पाणी आणि सीवर लाईन टाकण्याच्या कामाला गती दिली जाऊ शकते. रस्त्याची दुरुस्ती यासाठी सरकार बजेटमध्ये खर्च वाढवू शकते. ग्रामीण भागातील रस्त्यांवर सरकारचे विशेष लक्ष असेल.

atishi and arvind kejariwal
BJP Candidate List 2024 : तिकीट नाकारल्यानंतर माजी केंद्रीय मंत्र्याचा राजकारणातून संन्यास, ट्वीट करत म्हणाले...

आप सरकारची प्राथमिकता आरोग्य आणि शिक्षणावर आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पात देखील सरकार मोठा खर्च या क्षेत्रावर करु शकते. दिल्लीच्या जनतेला दिली जाणारी वीज बिल आणि पाणी पट्टी योजनांवरील अनुदान सुरुच ठेवले जाण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी पाण्याच्या पट्टीवरुन आप सरकार आणि उपराज्यपाल यांच्यामध्ये वाद निर्माण झाला होता. रोजगार, पर्यावरण यासंदर्भात योजना अर्थसंकल्पात असू शकतात. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()