Delhi Girl Accident Case : दिल्लीतील कंझावाला येथे नवीन वर्षाचे जल्लोष सुरू असतानाच एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीच्या मध्यरात्री एका अपघातात एक तरुणी गाडीखाली अडकली आणि ज्या कारसोबत मुलीच्या स्कूटीचा अपघात झाला त्या कारखाली अडकून मुलीला ७-८ किलोमीटर फरपटत नेण्यात आला
दरम्यान एवढ्या लांबपर्यंत ओढत नेल्यामुळे मुलीच्या कपड्यांसह तिच्या शरीर देखील सोलून निघाला. कार चालकाला हा प्रकार कळला तोपर्यंत मुलीचा मृत्यू झाला होता. पोलिसांना मुलीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळून आला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी कारमधील ५ आरोपींना अटक केली. याप्रकरणी दिल्ली पोलीस गुन्हा दाखल करून अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा - ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट
एकीकडे या घटनेने संपूर्ण देश हादरला असून दुसरीकडे दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी मुलीच्या कुटुंबीयांना पाच आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे, तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
दरम्यान या प्रकरणातील आरोपींवर आयपीसीची जी कलमे लावण्यात आली आहेत, त्यांच्यावर गुन्हा सिद्ध झाल्यास त्यांना किती शिक्षा होईल, या कलमांखाली दिलेली शिक्षा त्यांच्या या गुन्ह्यासाठी पुरेशी ठरेल का? चला जाणून घेऊया.
संपूर्ण प्रकरण काय आहे?
घटना 31 डिसेंबर 2022 ची असून दिल्लीतील सुलतानपुरी भागात रात्री उशिरा एक मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत स्कूटीवरून जात होती. दरम्यान, एका कारची स्कूटीला धडक बसली. या अपघातात स्कूटीवरील दोघी जखमी झाल्या. स्कूटीला धडकलेल्या कारमध्ये पाच जण होते आणि सर्व मद्यधुंद अवस्थेत होते.
गाडीला धडकल्यानंतर गाडी न थांबवता गाडीचा वेग वाढवण्यात आला.या धडकेमुळे स्कूटीवर बसलेल्या तरुणीचा पाय एक्सलमध्ये अडकला आणि गाडीच्या वेगासोबत तीही ओढली गेली. यावेळी त्यांचे सर्व कपडे फाटले. यात मुलीचा जागीच मृत्यू झाला.
कारमधील पाच आरोपींनी कंझावला रस्त्यावरील जोंटी गावाजवळ कार थांबवली असता, त्यांच्या कारमध्ये एक तरुणी अडकल्याचे त्यांना दिसले. आरोपीने मुलीला कारमधून बाहेर काढले आणि तिथे फेकून दिले. पोलिसांना तिचा मृतदेह सापडला तेव्हा त्याच्या अंगावर एकही कपडा नव्हता.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने कार चालक आणि आत बसलेले सर्व आरोपी सापडले.
कोणत्या कलमांत गुन्हा दाखल करण्यात आला
या प्रकरणी पाच आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, आरोपींविरुद्ध कलम २७९, ३०४, ३०४ए, १२०बी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्राथमिक तपासानंतर आणखी काही माहिती समोर आल्यास त्या कलमांचाही एफआयआरमध्ये समावेश केला जाईल, असेही पोलिसांनी सांगितले.
या कलमांमध्ये किती शिक्षा होऊ शकते?
आयपीसी कलम २७९
कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, हेतुपुरस्सर किंवा निष्काळजीपणे वाहन चालवणे, दुसऱ्याच्या जीवाला धोका निर्माण करणे किंवा दुखापत करणे या कलमांतर्गत येते. अशा प्रकरणात गुन्हा सिद्ध झाल्यास कमाल तीन महिने कारावास आणि एक हजार रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा एकत्र देण्याचीतरतूद आहे.
आयपीसी कलम ३०४
या अंतर्गत (अजानतेपणे हत्या) कोणत्याही हेतूशिवाय खून केल्याचा खटला चालतो. या प्रकरणात दोषी आढळल्यास, गुन्ह्याच्या गंभीरतेनुसार, शिक्षा जन्मठेप आणि दंड किंवा सश्रम कारावास असू शकते.
आयपीसी कलम ३०४ए
या कलमांतर्गत, उतावीळपणे, घाईघाईने असे कोणतेही कृत्य करणे ज्यामुळे हत्या होईल यातही शिक्षेची तरतूद आहे. अशा प्रकरणांमध्ये दोषी आढळल्यास दोन वर्षांपर्यंत कारावास, किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. ही जामीनपात्र कलमे आहेत. दंडाधिकारी या प्रकरणाची सुनावणी करू शकतात. यासोबतच जामिनासाठी अर्जही करता येतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.