High Court: 'आरोपींना धडा शिकवण्यासाठी जास्त काळ तुरुंगात ठेवू शकत नाही...' दिल्ली हायकोर्टाची टिप्पणी

Delhi High Court
Delhi High Courtसकाळ डिजिटल टीम
Updated on

Delhi High Court : मुलीच्या अपहरण प्रकरणावर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने एका आरोपीला जामीन मंजूर केला. मंगळवारी न्यायमूर्ती विकास महाजन यांच्या खंडपीठाने सुनावणीदरम्यान आरोपींना धडा शिकवण्यासाठी तुरुंगवासाचा कालावधी वाढवता येणार नाही, अशी टिप्पणी दिल्ली हायकोर्टाने केली आहे.

सुमारे दोन वर्षे आणि नऊ महिन्यांपासून अटकेत असलेल्या आरोपींकडून कोणतीही वसुली शिल्लक नाही आणि या प्रकरणाचा निकाल लागण्यास बराच कालावधी लागेल, असे न्यायालयाने म्हटले आहे. अशा परिस्थितीत केवळ आरोपींना धडा शिकवण्याच्या उद्देशाने खटला प्रलंबित असताना कारावास वाढवता येणार नाही. अशा स्थितीत याचिकाकर्त्याला जामिनावर सोडण्याचे आदेश दिले आहेत.

सप्टेंबर 2020 मध्ये पीडित मुलीच्या नातेवाईकांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली होती. अपहरणकर्त्याने 40 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. तसेच मागणी पूर्ण न केल्यास मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली होती, असा आरोप मुलींच्या वडिलांनी केला होता. (latest marathi news)

याप्रकरणी मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने सांगितले की, गुन्ह्याचे गांभीर्य हा जामीन नाकारण्याचा एकमेव निकष नाही.

Delhi High Court
CM Shinde : 'मराठी राज्यात हे चाललंय काय?' मुख्यमंत्र्यांनी गुजराती भाषेतून केली भाषणाची सुरूवात

ज्या व्यक्तीला दोषी ठरवण्यात आले आहे. त्याला तेव्हाच कोठडीत ठेवावे जेव्हा तो फरार होण्याची किंवा पुराव्यांशी छेडछाड करण्याची किंवा साक्षीदारांना धमकावण्याची शक्यता असते, असे न्यायालयाने म्हटले आहे. (ताज्या मराठी बातम्या)

पीडितेने सीआरपीसीच्या कलम 164 अंतर्गत एक निवेदन दिले होते की आरोपी व्यक्ती आणि त्याच्या मैत्रिणीने खंडणीसाठी तिचे अपहरण केले होते. तिच्यावर अत्याचार झाल्याचा देखील पीडितेचा आरोप होता. तिचा मोबाईल फोनही आरोपीने हिसकावून घेतला होता ज्यावरून तो खंडणीची मागणी करणारे कॉल आणि व्हॉट्सअॅप मेसेज पाठवत होता. 

Delhi High Court
Devendra Fadnavis: "होय मोदींनी लस तयार केली, कारण..." ; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()