Delhi high Court : कुणी पहिल्यांदा बनवलं 'बटर चिकन' अन् 'दाल मखनी'..? हायकोर्टात पोहोचला दोन हॉटेलमधील वाद!

देशातील सर्वात सुप्रसिद्ध खाद्यपदार्थांमध्ये दाल मखनी आणि बटर चिकनचा समावेश आहे. हे दोन्ही खाद्यपदार्थ अनेक जण चवीने खातात. मात्र, देशात सध्या या दोन्ही खाद्यपदार्थांवरून वाद सुरू झाला आहे.
Delhi high Court
Delhi high Courtesakal
Updated on

Delhi high Court : देशातील सर्वात सुप्रसिद्ध खाद्यपदार्थांमध्ये दाल मखनी आणि बटर चिकनचा समावेश आहे. हे दोन्ही खाद्यपदार्थ अनेक जण चवीने खातात. मात्र, देशात सध्या या दोन्ही खाद्यपदार्थांवरून वाद सुरू झाला आहे. हा वाद एवढा पेटला की, हे प्रकरण आता हायकोर्टात जाऊन पोहचले आहे.

दिल्लीतील दर्यागंज आणि मोती महल रेस्टॉरंटमध्ये दाल मखनी आणि बटर चिकनवरून वाद सुरू आहे. बटर चिकन आणि दाल मखनीचा शोध कुणी लावला? यावरून हा वाद सुरू असून आता हे प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयात जाऊन पोहचले आहे.

या दोन्ही पदार्थांवर दर्यागंज आणि मोती महल या रेस्टॉरंट्सनी आपला हक्क सांगितला आहे. दर्यागंज या रेस्टॉरंटने दाल मखनी आणि बटर चिकनचा शोध लावल्याचे श्रेय घेतल्याबद्दल मोती महलने त्यांच्यावर खटला दाखल केला आहे.

Delhi high Court
Delhi Cold Wave : दिल्लीमध्ये थंडीची भीषण लाट; 3.6 अंश सेल्सिअस एवढं कमी झालं तापमान! रेड अलर्ट जारी

मोती महल या रेस्टॉरंटच्या मालकांनी दावा केला आहे की, त्यांचे शेफ कुंदन लाल गुजराल हे १९५० पासून बटर चिकन आणि दाल मखनीचे शोधक म्हणून ओळखले जातात. ‘बटर चिकन आणि दाल मखनीचा शोधकर्ता’ ही टॅगलाईन अजूनही मोती महल या रेस्टॉरंटची ब्रॅंड ओळख असून त्याप्रमाणे रेस्टॉरंट कार्यरत आहे.

मोती महलने दर्यागंज रेस्टॉरंटवर असा आरोप केला आहे की, त्यांनी आमचा व्यवसाय आणि प्रतिष्ठेचा गैरवापर केला. तसेच, त्यांचे दिवगंत शेफ कुंदन लाल जग्गी यांनी बटर चिकन आणि दाल मखनी या खाद्यपदार्थांचा शोध लावल्याचा सामान्य लोकांसमोर दावा केला. यासोबतच ‘बटर चिकन आणि दाल मखनीचा शोधक’ ही टॅगलाईनही त्यांनी वापरली, जे अत्यंच चुकीचे आहे.

यासंदर्भात, मोती महल या रेस्टॉरंटची बाजू मांडणारे वकिल संदीप सेठी यांनी न्यायमूर्ती संजीव नरूला यांच्या खंडपीठासमोर सांगितले की, प्रसिद्ध ट्रेडमार्क असलेले ‘मोती महल’ हे रेस्टॉरंट १९२० पासून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर रेस्टॉरंट चालवत आहे.

दर्यागंज रेस्टॉरंटने दर्यागंज स्थित मोती महलशी आमचे दर्यागंज रेस्टॉरंट जोडलेले आहे, असे लोकांना सांगून त्यांची दिशाभूल करत असल्याचा युक्तिवाद नरूला यांनी न्यायालयात केला आहे. मोती महल या रेस्टॉरंटने केलेले हे आरोप निराधार आणि चुकीचे असल्याचा दावा दर्यागंज रेस्टॉरंटच्या वकिलांनी न्यायालयात केला आहे.

Delhi high Court
Street Foods In Ayodhya : राम मंदिराच्या दर्शनाला जाताय ? फक्त अयोध्येतच चाखता येतील 'हे' खास स्ट्रीट फूड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.