दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांची तब्येत बिघडली; रुग्णालयात दाखल

Delhi Health Minister Admitted To Hospital, Coronavirus Test Today
Delhi Health Minister Admitted To Hospital, Coronavirus Test Today
Updated on

नवी दिल्ली : दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ताप आणि श्वसनासाठी होत असलेल्या त्रासाच्या तक्रारीनंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सत्येंद्र जैन यांनी स्वतःच्या ट्विटरच्या माध्यमातून याची माहिती दिली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सध्या देशभरात कोरोनानं थैमान घातलेले असताना अनेकांना कोरोनाची लागण होत आहे. मागे काही दिवसांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना श्वसनाच्या आजारामुळे रुग्णालयात भरती करण्यात आले होते. अशातच आता अचानक श्वास घेण्यात होत असलेल्या त्रासामुळे तसंच जास्त ताप आल्याच्या कारणास्तव दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सोमवारी रात्री त्यांना दिल्लीतील राजीव गांधी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण अचानक कमी झाल्याचंही सांगण्यात येत आहे. आज (ता. १६) त्यांची कोरोना टेस्ट घेण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
--------
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; प्रशासनाने घेतला 'हा' निर्णय
---------
दिल्लीनंतर जम्मू काश्मीरसह गुजरातही हादरलं; ६.८ तीव्रतेचा भूकंप
----------
दरम्यान, काल (ता. १५) दिल्लीत १ हजार ६४७ करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तसेच ७३ जणांचा मृत्यू झाला. दिल्लीत आतापर्यंत ४२ हजार ८२९ कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. तर दुसरीकडे दिलासादायक बाब म्हणजे सोमवारी दिल्लीत ६०४ रुग्णांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आलं. तर आतापर्यंत या आजारातून बरे झालेल्या रुग्णांची संख्याही १६ हजार ४२७ झाली आहे. तर दिल्लीत आतापर्यंत करोनामुळे १ हजार ४०० जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिल्लीत सध्या २५,००२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.