Arvind Kejriwal Bail Stay: केजरीवालांच्या जामिनाला स्थगिती! हायकोर्टानं निर्णय ठेवला राखून

Delhi High Court orders interim stay on Arvind Kejriwal bail order: दिल्लीच्या कथित अबकारी कर घोटाळ्यातील मनी लॉन्डरिंग प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल कनिष्ठ कोर्टानं जामीन मंजूर केला होता.
Arvind Kejriwal Bail Petetion
Arvind Kejriwal Bail PetetionEsakal
Updated on

नवी दिल्ली : दिल्लीच्या कथित अबकारी कर घोटाळ्यातील मनी लॉन्डरिंग प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल कनिष्ठ कोर्टानं जामीन मंजूर केला होता. पण आता या जामिनाला दिल्ली हायकोर्टानं स्थगिती दिली आहे. तसेच आपला निर्णय राखून ठेवला, त्यामुळं केजरीवालांना काही काळ तुरुंगातच रहावं लागणार आहे. (Delhi High Court orders interim stay on Arvind Kejriwal bail order)

गुरुवारी राऊज अव्हेन्यू कोर्टानं केजरीवाल यांना जामीन मंजूर केला होता. यावर ईडीनं दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी हायकोर्टात धाव घेतली. यावर तात्काळ सुनावणी घेण्यात यावी अशी मागणी यावेळी ईडीनं केली. ईडीच्या या मागणीनुसार तातडीनं सुनावणी घेण्यास हायकोर्टानं परवानगी दिली. ईडीनं यावेळी दावा केला की, आम्हाला केजरीवालांच्या जामीन याचिकेला विरोध करण्याची पूर्ण संधीच दिली गेली नाही. त्यामुळं खालच्या कोर्टानं मंजूर केलेल्या जामिनाला स्थगिती देण्यात यावी. यावर केजरीवालांच्या वकिलांनी ईडीच्या वकिलांना सल्ला दिला की, त्यांनी कोर्टाच्या निर्णयाचा सन्मानानं स्विकार करायला हवा.

Arvind Kejriwal Bail Petetion
Maharashtra Police AI: महाराष्ट्र पोलीस बनणार देशात अत्याधुनिक; AI चा वापराबाबत फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती

संजय सिंह यांचा मोदींवर हल्लाबोल

दरम्यान, ईडीनं केजरीवालांच्या जामिनाविरोधात हायकोर्टात धाव घेतल्यानं आपचे खासदार संजय सिंह यांनी टीका केली आहे. त्यांनी म्हटलं की, "मोदी सरकारची गुंडगिरी पाहा. अजून ट्रायल कोर्टाच्या आदेशाची कॉपी देखील मिळालेली नाही तोवर मोदींची ईडी हायकोर्टात आव्हान द्यायला हजर झालीए. या देशात हे काय सुरुए? न्याय व्यवस्थेची मोदींकडून सध्या मस्करी सुरु आहे. संपूर्ण देश याकडं पाहतोय"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.