वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने घेतले कठोर निर्णय; 20 तारखेपर्यंत शाळांना सुट्टी अन्...

Delhi Pollution
Delhi Pollutionsakal
Updated on

नवी दिल्लीः दिल्लीमध्ये वाढत्या प्रदूषणामुळे शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय रविवारी घेण्यात आलेला होता. आता दिल्ली सरकारने आणखी कठोर निर्णय घेतले आहेत. दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी याबाबतची माहिती दिली.

मंत्री गोपाल राय यांनी सांगितलं की, दिल्लीत एका आठवड्यासाठी ऑड इव्हन लागू असेल. तसेच दिवाळीनंतर 13 तारखेपासून पुन्हा ऑड इव्हन लागू करण्यात येणार आहे. 20 तारखेपर्यंत 10 वी आणि 12 वीचे वर्ग सोडून सर्व शाळांना सुट्टी देण्यात येईल.

Delhi Pollution
Privatisation News: मोदी सरकारचा मोठा निर्णय! आणखी एक सरकारी कंपनी विकणार; मॅनकाइंड आणि बैद्यनाथ...

दिल्लीतील सगळ्या बांधकामाच्या कामांना स्थगिती देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याबरोबरच BS3 पेट्रोल, BS4 डिझेलच्या वाहनांना रस्त्यावर येण्यासाठी बंदी घालण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हे निर्णय घेतल्याचं पर्यावरण मंत्र्यांनी स्पष्ट केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.