जहांगीरपुरीसारखा हिंसाचार कसा थांबवायचा? किरण बेदींनी सांगितला उपाय

Kiran Bedi
Kiran Bediesakal
Updated on
Summary

दिल्लीतील जहांगीरपुरीत हनुमान जयंतीच्या दिवशी झालेल्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आलीय.

Delhi Jahangirpuri Violence : रामनवमी (Ramanavami) आणि हनुमान जयंतीच्या (Hanuman Jayanti) दिवशी देशभरात हिंसाचार आणि दंगली झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. दिल्लीतील जहांगीरपुरीत हनुमान जयंती दिवशी मोठा हिंसाचार झाला. या हिंसाचारात 8 पोलिसांसह 9 जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 25 आरोपींना अटक केलीय. या दरम्यान, माजी आयपीएस आणि पुद्दुचेरीच्या माजी एलजी किरण बेदी (Kiran Bedi) यांनी दंगल रोखण्यासाठी काही सूचना केल्या आहेत.

दिल्लीतील जहांगीरपुरीत हनुमान जयंतीच्या दिवशी झालेल्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आलीय. हिंसाचार प्रकरणाच्या तपासात गुन्हे शाखेच्या पथकानं (Delhi Police) आतापर्यंत सुमारे 300 आरोपींची ओळख पटवली आहे, त्यांच्या अटकेसाठी छापे टाकले जात आहेत. या प्रकरणी आतापर्यंत अस्लम, अन्सार, सोनू चिकनासह 26 जणांना अटक करण्यात आली असून त्यात दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. सूत्रांकडून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या पथकानं आतापर्यंत तपासात सुमारे 300 आरोपींची ओळख पटवली असून त्यांच्या अटकेसाठी शोध मोहीम सुरुय.

Kiran Bedi
झुकेगा नहीं साला! Allu Arjun नं धुडकावली कोट्यवधींची ऑफर

1- किरण बेदींच्या मते, कोणत्याही अरुंद आणि संवेदनशील भागात मिरवणूक काढण्यापूर्वी किंवा परवानगी देण्यापूर्वी काही गोष्टींचं काटेकोरपणे पालन करायला हवं. जेणेकरुन तेथील लोकांनाही सुरक्षितता आणि शांतता राखण्यासाठी जबाबदार धरता येईल.

2- मिरवणुकीत बाजार असोसिएशन किंवा परिसरातील महिला समित्यांसह ज्येष्ठ व्यक्तींना पालक म्हणून काम करण्यास प्रवृत्त करावं. शांतता सुनिश्चित करण्यात महिलाही महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.

3 - या भागात राहणार्‍या लोकांवर भूतकाळात गुन्हे दाखल असतील, तर त्यांच्यावर नजर ठेवायला हवी. त्यांना कायद्याच्या कक्षेत आणायला हवं.

Kiran Bedi
लिंबूचे दर रोखण्यासाठी चक्क तंत्र-मंत्र पूजा; भगवती मंदिरात दिला बळी

4 - छतावर ज्वलनशील पदार्थ किंवा विटा, दगड आहेत की नाही याची खातरजमा करावी.

5- या भागात कोणत्याही व्यक्तीकडं परवानाधारक शस्त्रं असतील, तर ती जमा करावीत.

6- कोणतीही घटना घडल्यास पोलीस यंत्रणेला माहिती द्यावी. शिवाय, शांतता समितीत महिलांचाही समावेश करावा. तसंच पोलिसांनी मिरवणुकीपूर्वी स्थानिक लोकांची बैठक घ्यावी.

7- या भागात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत की नाही, याची पाहणी करावी. त्याशिवाय रेकॉर्ड ठेवण्यासाठी संबंधितांना लेखी कायदेशीर सूचना देण्यात यावी. जेणेकरुन गुप्तचर माहितीच्या आधारे त्याचा वापर करता येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()