Umar Khalid Bail Rejected: उमर खालिदला मोठा झटका! कोर्टानं पुन्हा फेटाळला जामीन अर्ज

दुसऱ्यांदा त्याचा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला आहे. Big blow to Omar Khalid!
umar khalid
umar khalidesakal
Updated on

नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठ अर्थात जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता उमर खालिद याचा जामीन अर्ज आज दिल्लीच्या कारकरदुमा कोर्टानं फेटाळला. दिल्लीतील २०२० मधील दंगल प्रकरणातील तो आरोपी आहे. या प्रकरणात नियमित जामिनासाठी त्यानं अर्ज केला होता. दुसऱ्यांचा त्याचा जामीन फेटाळण्यात आला आहे. (Delhi Karkardooma Court rejects bail application of Umar Khalid in larger conspiracy of Delhi riots case)

कडकडडुमा कोर्टाचे अतिरिक्त न्यायाधीश समीर वाजपेयी यांच्या कोर्टानं उमर खालीदचा जामीन फेटाळला आहे. यापूर्वी २०२२ मध्ये ट्रायल कोर्टानं उमर खालीदचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. सुप्रीम कोर्टाकडून दिलासा न मिळाल्यानं त्यानं पुन्हा नव्यानं याचिका दाखल केली होती. ऑक्टोबर २०२२ मध्ये जामीन देण्यास नकार दिल्याच्या आदेशाला खालीदनं दिल्ली हायकोर्टात आव्हान दिलं होतं.

umar khalid
Ajit Pawar: जरंडेश्वर कारखान्याची पुन्हा चौकशी सुरु! अजित पवारांच्या मागे ससेमिरा?

उमर खालीदवर काय आहेत आरोप?

दिल्लीमध्ये फेब्रुवारी २०२२ मध्ये दंगल झाली होती. या दंगलीचा कट उमर खालीदसह इतरांनी रचल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. या दंगलीत ५३ जण ठार झाले होते तर ७०० पेक्षा अधिक जण जखमी झाले होते. देशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका उमर खालीदवर ठेवण्यात आला आहे. त्यासाठी बेकायदा कारवाया प्रतिबंध कायदा (UAPA) अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()