मद्यानंतर आता औषध घोटाळा? केजरीवालांचे पाय आणखी खोलात, CBI चौकशीचे आदेश

अरविंद केजरीवाल सरकारच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. सध्या केजरीवाल सरकारमधील अनेक नेत्यांवर मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी आरोप असून काहींवर कारवाई झाली आहे.
Delhi LG VK Saxena writes CBI inquiry into it spurious drugs in Delhi arvind kejariwal
Delhi LG VK Saxena writes CBI inquiry into it spurious drugs in Delhi arvind kejariwal
Updated on

नवी दिल्ली- अरविंद केजरीवाल सरकारच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. सध्या केजरीवाल सरकारमधील अनेक नेत्यांवर मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी आरोप असून काहींवर कारवाई झाली आहे. त्यातच आणखी एका प्रकरणात केजरीवाल यांचे पाय खोलात जाण्याचे चिन्हं आहेत. (Delhi LG VK Saxena writes to Chief Secretary and CBI inquiry into it spurious drugs in Delhi government hospitals)

दिल्लीचे उपराज्यपाल वीके सक्सेना यांनी औषध घोटाळ्याप्रकरणी सीबीआयला तपास करण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारी रुग्णालयांच्या औषध खरेदीमध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप उपराज्यपालांनी केला आहे. त्यामुळे आधीच एका प्रकरणात अडकलेल्या दिल्ली सरकारसाठी हा मोठा धक्का असल्याचं बोललं जातंय.

Delhi LG VK Saxena writes CBI inquiry into it spurious drugs in Delhi arvind kejariwal
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांना पुन्हा समन्स, गुरुवारी चौकशीला बोलावलं

उपराज्यपालांनी दिल्ली सरकारमधील हॉस्पिटलमध्ये औषध खरेदी प्रकरणात काही अनियमितता आढळल्याचा आरोप केलाय. त्यानंतर सीबीआयमार्फत चौकशीचे आदेश दिले आहेत. सरकारी रुग्णालयात औषधी खरेदी करताना कसूर करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय.

एएनआय या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार दिल्ली सरकारमधील औषथांच्या खरेदी प्रकरणात सतर्कता विभागाने रिपोर्ट सादर केला होता. त्यानंतर दिल्लीचे उपराज्यपाल वीके सक्सेना यांनी सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांनी मुख्य सचिव नरेश कुमार यांना पत्र लिहून तपास करण्यास सांगितलं आहे.

Delhi LG VK Saxena writes CBI inquiry into it spurious drugs in Delhi arvind kejariwal
India Alliance: इंडिया आघाडीत पुन्हा एकदा पेच... अरविंद केजरीवालांच्या भूमिकेमुळे सर्वांना टेन्शन!

मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी आप सरकारमधील माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया आणि खासदार संजय सिंह हे तुरुंगात आहेत. अरविंद केजरीवाल यांना देखील सक्तवसुली संचालनालयाने याप्रकरणी समन्स पाठवून हजर राहण्याचे आदेश दिले होते. पण, केजरीवाल यांनी दोनवेळा या समन्सला केराची टोपली दाखवली आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.