Delhi Liquor Case : के. कविता यांची सीबीआय चौकशी करण्यास कोर्टाची परवानगी

मद्य धोरण गैरव्यवहाराशी संबंधित हवाला प्रकरणाच्या अनुषंगाने ईडीने कविता यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आता सीबीआयकडून चौकशी होणार असल्याने कविता यांच्या अडचणीत भर पडली आहे.
K. Kavita
K. KavitaEsakal
Updated on

Delhi Liquor Case K. Kavita : मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणी बीआरएसच्या नेत्या के. कविता यांची चौकशी करण्यास राउज अव्हेन्यू न्यायालयाने सीबीआयला परवानगी दिली आहे. तेलंगणचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या असलेल्या कविता यांना ईडीने १५ मार्च रोजी हैदराबादमध्ये अटक केली होती. यानंतर त्यांना दिल्लीत आणले गेले होते. सध्या त्या तिहार तुरुंगात आहेत.

मद्य धोरण गैरव्यवहाराशी संबंधित हवाला प्रकरणाच्या अनुषंगाने ईडीने कविता यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आता सीबीआयकडून चौकशी होणार असल्याने कविता यांच्या अडचणीत भर पडली आहे.

K. Kavita
Lok Sabha Election : 'वंचितसाठी चर्चेची दारे अद्याप खुली, शेवटच्या दिवशी काहीही शक्य'; काँग्रेस अजूनही प्रतीक्षेत?

मुलाची वार्षिक परिक्षा असल्याने जामीन दिला जावा, अशा विनंतीची कविता यांची याचिका अलीकडेच न्यायालयाने फेटाळून लावली होती. दक्षिणेतील लॉबीला दिल्लीतील मद्यविक्रीचे परवाने प्राप्त व्हावेत, यासाठी कविता यांनी आम आदमी पक्षाला १०० कोटी रुपयांची लाच दिली असल्याचा तपास संस्थांचा संशय आहे.

K. Kavita
Hardik Pandya Somnath Temple : अडचणीत सापडलेल्या पांड्याची महादेवाच्या चरणी धाव; सोमनाथ मंदिरातील Video व्हायरल

के. कविता यांची बँक खाती पाहणाऱ्या बुची बाबू याच्या चॅटमधून महत्त्वाची माहिती मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर कविता यांची चौकशी करणे गरजेचे आहे. परिणामी त्यांच्या चौकशीस परवानगी दिली जावी, असा विनंती अर्ज सीबीआयने विशेष न्यायालयात दिला होता. यावर न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी सीबीआयला संबंधित परवानगी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.