Delhi liquor case : बीआरएस नेत्या के. कविता यांना जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

Delhi liquor case : दिल्लीतील उत्पादन शुल्क प्रकरणात गंभीर आरोप झालेल्या भारत राष्ट्र समितीच्या नेत्या के. कविता यांना जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. जामिनासाठी संबंधित कनिष्ठ न्यायालयात दाद मागा, असे निर्देश न्यायाधीश संजीव खन्ना, न्यायाधीश एम. एम. सुंदरेश आणि न्यायाधीश बेला त्रिवेदी यांच्या खंडपीठाने सुनावणीदरम्यान दिले.
k kavita
k kavita
Updated on

Delhi liquor case : दिल्लीतील उत्पादन शुल्क प्रकरणात गंभीर आरोप झालेल्या भारत राष्ट्र समितीच्या नेत्या के. कविता यांना जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. जामिनासाठी संबंधित कनिष्ठ न्यायालयात दाद मागा, असे निर्देश न्यायाधीश संजीव खन्ना, न्यायाधीश एम. एम. सुंदरेश आणि न्यायाधीश बेला त्रिवेदी यांच्या खंडपीठाने सुनावणीदरम्यान दिले.

शिष्टाचारानुसार तुम्ही आधी संबंधित न्यायालयात दाद मागणे अपेक्षित आहे, अशी टिप्पणी न्यायालयाने केली. हवाला प्रतिबंधक कायद्यातील विविध कलमांनुसार सक्तवसुली संचलनालयाने कविता यांना अटक केली आहे. कविता यांनी या अटकेला आव्हान दिले आहे. त्याची नोंद घेत सर्वोच्च न्यायालयाने ईडीला नोटीस बजावत सहा आठवड्यांच्या आत उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. के. कविता यांच्यातर्फे कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली.

k kavita
Sharad Pawar Seat Allocation : शरद पवार गटाच्या ९ उमेदवारांची संभाव्य यादी; बारामती, माढा, बीडमधून कोण?

भावनिक न होण्याचे सिब्बल यांना आवाहन

देशात काय सुरु आहे पहा. केवळ साक्षीदाराच्या जबाबावर राजकीय विरोधकांना अटक केली जात आहे. हे अत्यंत दुर्दैवास्पद असल्याचे सिब्बल यांनी सुनावणीदरम्यान सांगितले. त्यावर 'एक वकील म्हणून तुम्ही निराश अथवा भावनिक होऊ नका', असा शेरा खंडपीठाने मारला.

k kavita
Arvind Kejriwal Arrest : दिल्लीमध्ये राष्ट्रपती राजवट लागू शकते का? उपराज्यपालांकडे आहेत 'हे' अधिकार

सर्व प्रलंबित याचिकांसोबत कविता यांची याचिका सुनावणीसाठी घेतली जाईल. कविता यांच्या जामीन अर्जाचा विचार करायचा झाला तर त्यासाठी तुम्ही संबंधित न्यायालयात दाद मागा, असेही न्यायालयाने सिब्बल यांना सांगितले. सिब्बल यांनी झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन तसेच इतर काही नेत्यांच्या अटकेचा मुद्दा उपस्थित केला. यावर राजकीय भाष्य करू नका, असे खंडपीठाने सिब्बल यांना सुनावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.