Delhi Lok Sabha Election 2024: एकही जागेसाठी तयार नसलेल्या 'आप'ने काँग्रेसला 3 जागा कशा दिल्या? बदल्यात काय मिळाले?

Delhi Lok Sabha Election 2024:लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या इंडिया आघाडीत जागावाटपाची चर्चा सुरु आहे. इंडिया आघाडीत दिल्लीत निवडणुकीसाठी तिढा सुटला आहे.
Delhi Lok Sabha Election 2024 News in marathi
Delhi Lok Sabha Election 2024 News in marathiesakal
Updated on

Delhi Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या इंडिया आघाडीत जागावाटपाची चर्चा सुरु आहे. इंडिया आघाडीत दिल्लीत निवडणुकीसाठी तिढा सुटला आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांच्यात जागावाटप झाल्यानंतर आता दिल्लीत आम आदमी पक्षाचा प्रश्न देखील सुटल्याची चर्चा आहे. दिल्लीत दोन्ही पक्षांमध्ये ४-३ फॉर्म्युल्यावर बोलणी झाली आहे. पंजाब वगळता इतर तीन राज्यात आप आणि काँग्रेस मैत्री दिसणार आहे.

काँग्रेस आणि आपमधील जागावाटपाची औपचारीक घोषणा आज (गुरुवार) किंवा उद्या (शुक्रवार) होण्याची शक्यता आहे. सुत्रांच्या माहितीनुसार आप आणि काँग्रेसमध्ये तीन - चार मुद्यांवर एकमत झाले आहे.

आप चार तर काँग्रेस तीन जागांवर लढण्याची शक्यता आहे. काँग्रेस पूर्व दिल्ली, ईशान्य दिल्ली आणि चांदनी चौकातून निवडणूक लढवणार आहे, तर आप पश्चिम दिल्ली, दक्षिण दिल्ली, नवी दिल्ली आणि दक्षिण पश्चिम जागांवर उमेदवार उभे करणार आहे.

यापूर्वी आम आदमी पार्टीने दिल्लीत काँग्रेसला फक्त एक जागा देण्याचे म्हटले होते. काँग्रेसला एकही जागा देण्यासाठी आकडेवारी पुरेशी नाही. मात्र युती धर्माचे पालन केल्यास काँग्रेसला एक जागा देऊ, असे आप राज्यसभा खासदार संदीप पाठक यांनी म्हटले होते. मात्र काँग्रेसने संयम ठेवते चर्चा सुरु ठेवली. त्यामुळे'आप'ने 'प्रेशर गेम' अंतर्गत अशी घोषणा केल्याचे मानले जात होते.

Delhi Lok Sabha Election 2024 News in marathi
IND vs ENG 4th Test Ranchi Pitch : ना विराट, ना राहुल, ना बुमराह तरी अडीच दिवसात संपणार सामना ? रोहित शर्माचा प्लॅन बी तयार

आप'ला काय मिळाले?

दरम्यान आपने दिल्लीत काँग्रेसला तीन जागा देण्याच्या बदल्यात गुजरातपासून हरियाणापर्यंतचा वाटा घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेसने गुजरातमध्ये आम आदमी पार्टीला ३ जागा देण्याचे मान्य केले आहे.

त्यांना हरियाणातील एका जागेवर निवडणूक लढवण्याची संधीही दिली जाणार आहे. पंजाबमध्ये दोन्ही पक्ष स्वतंत्र लढणार असले तरी चंदीगडमध्ये 'आप' काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहे.  याआधी दोन्ही पक्ष एकत्र आल्याने चंदीगडचे महापौरपद 'आप'चे झाले आहे.

काँंग्रेसचा बालेकिल्ला -

दिल्लीत लढण्यासाठी आता काँग्रेसला संघर्ष करावा लागत आहे. लोकसभेच्या जागांसाठी त्यांना 'आप'वर अवलंबून राहावं लागलं. मात्र दिल्ली कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. २०१४ ते २०१९ काँग्रेसला दिल्लीत एकही जागा जिंकता आली नाही.

मात्र २००९ मध्ये त्यांनी सर्वाधिक ९ जागा जिंकल्या होत्या. 'आप'च्या राजकारणात प्रवेशपूर्वी सलग १५ वर्षे काँग्रेस विधानसभेत सत्तेत होती.  गेल्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेस मतांच्या बाबतीत 'आप'पेक्षा पुढे होती. काँग्रेसला २२.५० टक्के तर ‘आप’ला १८.१० टक्के मते मिळाली होती. भाजपने ५६ टक्के मते घेत सर्व जागा जिंकल्या होत्या.

Delhi Lok Sabha Election 2024 News in marathi
Condom Packs with Party Names: सत्तेसाठी काहीही... आता कंडोमच्या पाकिटांवरही निवडणुकांचा प्रचार; व्हिडिओ व्हायरल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.