Loksabha Election 2024 : लोकांनी द्वेषाला धुडकावले; राहुल गांधी यांचे प्रतिपादन

सातव्या टप्प्यासाठी आज मतदान झाले. राहुल गांधींसह त्यांची आई आणि पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नवी दिल्लीतील मतदान केंद्रावर मतदान केले.
RAHUL gandhi and priyanka gandhi
RAHUL gandhi and priyanka gandhiesakal
Updated on

नवी दिल्ली - ‘लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या पाच टप्प्यांत लोकांनी खोटेपणा, द्वेष आणि तिरस्कारला डावलून त्यांच्या जीवनाशी निगडित मुद्दांना प्राधान्य दिले आहे,’ असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शनिवारी सांगितले.

सातव्या टप्प्यासाठी आज मतदान झाले. राहुल गांधींसह त्यांची आई आणि पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नवी दिल्लीतील मतदान केंद्रावर मतदान केले. ‘मी आणि माझ्या आईने मतदान करून लोकशाहीच्या या महान उत्सवात योगदान दिले आहे. तुम्ही सर्वांनीही मोठ्या संख्येने घराबाहेर पडावे, तुमच्या हक्कासाठी आणि तुमच्या कुटुंबाच्या भवितव्यासाठी मतदान करावे,’ असे गांधी म्हणाले.

मतदानानंतर राहुल आणि सोनिया गांधी यांचे शाई लावलेले बोट दाखवितानाचे छायाचित्र पोस्ट केले आहे. ‘एक्स’वर हिंदीत पोस्ट करताना मतदारांना उद्देशून ते म्हणाले की, पहिल्या पाच टप्प्यात तुम्ही खोटेपणा, द्वेषाला धुडकावून तुमच्या जीवनाशी निगडित मुद्द्यांना प्राधान्य दिले आहे. आज सहाव्या टप्प्यातील मतदीन आहे.

सरकारमधील रिक्त ३० लाख जागांवर भरती, युवकांसाठी वार्षिक एक लाख पक्की नोकरीची हमी तुमचे प्रत्येक मत निश्‍चित करणार आहे. गरीब कुटुंबातील महिलांच्या खात्यात आठ हजार ५०० रुपये प्रत्येक महिन्याला जमा होतील, शेतकरी कर्जमुक्त होणार असून त्यांच्या पिकाला योग्य हमी भाव मिळेल. तसेच मजुरांना दैनिक ४०० रुपये मजुरी मिळणार आहे. ‘तुमचे मत केवळ तुमचे आयुष्यच सुधारणार नाही तर लोकशाही आणि राज्यघटनेचेही रक्षण करेल,’ असेही ते म्हणाले.

‘इंडिया’ आघाडीच्या बाजूने जनमत - प्रियांका गांधी

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी पती रॉबर्ट वद्रा, मुलगी मिराया आणि मुलगा रेहान वद्रा यांच्यासह आज मतदान केले. त्यानंतर बोलताना त्या म्हणाल्या, ‘बेरोजगारी आणि महागाई ही देशातील सर्वात मोठी समस्या आहे आणि लोकसभा निवडणुकीत ‘इंडिया’ आघाडीच्या बाजूने जनमत असल्याने आम्ही विजयी होऊ.’

काँग्रेस नेते आम आदमी पक्षाच्या (आप) उमेदवारांना मतदान करतात किंवा ते तुमच्या पक्षाला करतात, याबद्दल विचारले असता प्रियांका गांधी म्हणाल्या की, मतभेद बाजूला ठेवून आम्ही आमच्या राज्यघटनेला आणि लोकशाहीला मतदान करत आहोत. मला त्याचा अभिमान आहे.

‘भाजपचे नेते सर्व गोष्टींवर बोलतात; पण बेरोजगारी आणि महागाई या प्रमुख समस्यांवर चर्चा करीत नाहीत. लोक आता कंटाळले आहे,’ असे प्रियंका गांधी म्हणाल्या. काँग्रेसच्या बाजूने यंदा काय मुद्दा आहे, असे विचारले असता त्या म्हणाल्या की, आम्ही सुरुवातीपासूनच लोकांच्या प्रश्नांवर बोलत आहोत आणि याच विषयावर आम्ही प्रचार करीत आहोत. आमचा जाहीरनाम्यातही हेच नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.