AAP Govt News : 'आप'ला पुन्हा मोठा धक्का! दिल्ली सरकारमधील बड्या मंत्र्याने दिला राजीनामा

AAP Govt News : केजरीवाल सरकारमधील मंत्री राजकुमार आनंद यांनी आज तडकाफडकी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.
Arvind Kejriwal
Arvind Kejriwalesakal
Updated on

नवी दिल्ली, ता. १० ः दिल्लीच्या मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री आणि मंत्र्यांसह बडे नेते अटकेत असताना आता केजरीवाल सरकारमधील मंत्री आनंद कुमार यांनी राजीनामा दिल्यामुळे आम आदमी पक्षाला(आप) मोठा धक्का बसला आहे.भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून ‘आप’च्या धोरणांवर नाराजी व्यक्त करताना आनंद कुमार यांनी राजीनामा दिला आहे. ‘आप’ने मात्र हा भाजपचा पक्ष फोडण्याचा प्रकार असल्याचा आरोप केला आहे.

केजरीवाल सरकारमधील मंत्री राजकुमार आनंद यांनी आज तडकाफडकी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांच्याकडे समाजकल्याण मंत्रालयाची जबाबदारी होती. तूर्तास कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचे स्पष्ट करताना राजकुमार आनंद यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर ‘आप’च्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.

‘‘दिल्ली सरकारची सात खाती माझ्याकडे असूनही माझ्यावर कोणतेही आरोप झालेले नाहीत, माझे काम व्यवस्थित आहे,’’ असे राजकुमार आनंद यांनी राजीनाम्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, की राजकारण बदलेल असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले होते. त्यामुळे मी राजकारणात आलो होतो. परंतु आज राजकारण नव्हे तर राजकारणी बदलले आहेत हे सखेद सांगावे लागते आहे. ‘आप’चा जन्म भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातून झाला होता. परंतु हा पक्ष आता भ्रष्टाचाराच्या गाळात रुतला आहे. या सरकारमध्ये मंत्री म्हणून काम करणे माझ्यासाठी अवघड झाल्याने मी राजीनामा देत आहे, असे राजकुमार आनंद म्हणाले.

Arvind Kejriwal
Google Cloud Next 2024 : गुगलने लाँच केले नवीन एआय फीचर्स, आता व्हिडीओ बनवणं होणार सोपं

आप दलित विरोधी


आनंद कुमार यांनी ‘आप’वर दलितविरोधी असल्याचाही आरोपही यावेळी केला. राज्यसभेमधील पक्षाच्या १३ खासदारांमध्ये कोणीही दलित, मागासवर्गीय अथवा महिला नाही. पक्षात दलित आमदार, नगरसेवक आणि मंत्र्यांचा आदरही राखला जात नाही. त्यामुळे दलितांमध्ये फसवणुकीची भावना वाढली आहे. हे देखील राजीनाम्याचे कारण असल्याचे राजकुमार आनंद म्हणाले.

Arvind Kejriwal
Lok Sabha Election: शिवसेनेपुढे नमते घेऊन पुढे जाण्याचे काँग्रेसचे धोरण, जागावाटपाच्या तिढा सुटत नसल्याने घेतला निर्णय

हा पक्ष फोडण्याचा प्रयत्न – आप

दरम्यान, राजकुमार आनंद यांच्या राजीनाम्यानंतर राज्यसभा खासदार संजयसिंह आणि केजरीवाल सरकारमधील मंत्री सौरभ भारद्वाज यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन राजीनामा प्रकरणासाठी केंद्रातील सत्ताधारी भाजपवर तोफ डागली. मुख्यमंत्री केजरीवाल यांना तुरुंगात टाकल्यानंतर पक्ष फोडण्याचा तसेच दिल्ली आणि पंजाबमधील सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरू होईल असा इशारा आपण आधीच दिला होता, असा दावा सौरभ भारद्वाज यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.