Delhi CM Atishi: आमदार झाल्यानंतर चौथ्याच वर्षी मुख्यमंत्री; ऑक्सफोर्डमध्ये शिकलेल्या आतिशी यांनी कसा केला चमत्कार?

Atishi to be the new Delhi CM Who is She? आतिशी या २०२० च्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा आमदार झाल्या होत्या, त्यानंतर २०२३ मध्ये त्या पहिल्यांदा केजरीवाल सरकारमध्ये मंत्री झाल्या.
Delhi CM Atishi
Delhi CM Atishi
Updated on

नवी दिल्ली- अरविंद केरजीवाल यांनी मुख्यमंत्री म्हणून आतिशी मरलेना ( atishi marlena ) यांच्या नावाचा प्रस्ताव पुढे ठेवलाय. त्यामुळे दिल्लीला पुन्हा एकदा महिला मुख्यमंत्री मिळणार असल्याचं स्पष्ट झालंय.त्यांच्याच नावाची जोरदार चर्चा होती. त्यानंतर आज त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. आतिशी या पंजाबी राजपूत कुटुंबातून येतात. त्यांचे ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमधून शिक्षण झालंय.

आतिशी या २०२० च्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा आमदार झाल्या होत्या, त्यानंतर २०२३ मध्ये त्या पहिल्यांदा केजरीवाल सरकारमध्ये मंत्री झाल्या. आता, २०२४ मध्ये त्या मुख्यमंत्री होत आहेत. अत्यंत कमी वेळात त्यांनी मोठी प्रगती केली आहे. आतिशी यांना अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय मानले जाते. शिवाय त्या पक्षाच्या कठीण काळात खिंड लढवणाऱ्या नेत्या होत्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.