पंजाबमध्येही दिसेल दिल्लीचे मॉडेल : मान

दिल्लीमध्ये शिक्षण क्षेत्रात झालेल्या क्रांतीची देशभर चर्चा होते.
Bhagvant Man
Bhagvant ManSakal
Updated on

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील शिक्षणाच्या मॉडेलचीच पंजाबमध्ये अंमलबजावणी करण्याचा निर्धार मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केला आहे. वेगवेगळ्या प्रकारची आर्थिक पार्श्वभूमी असणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असलेल्या मान यांनी आज वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तेथील आरोग्य संस्था आणि शाळांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियादेखील उपस्थित होते. दिल्लीमध्ये शिक्षण क्षेत्रात झालेल्या क्रांतीची देशभर चर्चा होते.

आम्ही आता पंजाबमध्ये देखील याचीच पुनरावृत्ती घडवून आणणार आहोत. यामुळे राज्यातील गरीब आणि श्रीमंत विद्यार्थ्यांनाही गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळू शकेल. भारतातील राज्ये अशाच पद्धतीने परस्परांकडून शिकत प्रगती करू शकतील असा विश्वास मान यांनी व्यक्त केला. देशातील शिक्षण व्यवस्था मजबूत करण्यासाठी सगळ्यांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे असेही केजरीवाल यांनी यावेळी सांगितले.

सध्या दिल्लीतील ९५ टक्के जनता ही आम आदमी मोहल्ला क्लिनिकचा वापर करते. या आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या सोयी-सुविधांवर सामान्य लोक समाधानी आहेत. या रुग्णालयांमध्ये रुग्णांना डॉक्टरांना भेटण्यासाठी आणि नोंदविलेली औषधे घेण्यासाठी केवळ दहा मिनिटांचा अवधी लागतो.

- अरविंद केजरीवाल,मुख्यमंत्री दिल्ली

नवी दिल्ली: कौटिल्य सरकारी सर्वोदय बाल विद्यालयाच्या भेटीदरम्यान सोमवारी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()