नवी दिल्ली : दिल्लीच्या मुखर्जीनगर भागात कोचिंग सेंटर असलेल्या एका इमारतीला आग लागल्याचं वृत्त आहे. या आगीपासून बचावासाठी कोचिंग सेंटरमधील विद्यार्थ्यांनी खिडकीतून बाहेर उड्या मारल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ११ अग्निशमनच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. (Delhi Mukherjee Nagar Fire Students in coaching center jumped from the window)
मीडियातील वृत्तानुसार, मुखर्जी नगर येथील एका कोचिंग सेंटरमधील तिसऱ्या मजल्यावर आग लागली. कोचिंग क्लासेस सुरु असताना ही आग लागल्यानं मोठा गोंधळ निर्माण झाला. यावेळी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी या क्लासमधील मुलांनी खिडकीतून रस्सीच्या सहाय्यांन खाली उतरण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, या आगीमध्ये चार विद्यार्थी जखमी झाल्याचंही सांगितलं जात आहे. (Latest Marathi News)
सुत्रांच्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास ही आग लागली असून या आगीचा व्हिडिओ अग्निशमन दलाकडूनच शेअर करण्यात आला होता. या आगीमध्ये बहुतेक विद्यार्थी अडकून पडले होते. या विद्यार्थ्यांना बचावाचं काम अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुरु असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. (Marathi Tajya Batmya)
इमारतीतील इलेक्ट्रिक मीटरमध्ये शॉर्टसर्किट झाल्यानं आग लागल्याचं सांगितलं जात आहे. ही आग आता विझवण्यात यश आलं आहे. या दुर्घटनेत ४ विद्यार्थी जखमी झाले आहेत. ही आग मोठी नव्हती, त्यामुळं संभाव्य हानी टळली, अग्निशमन दलाचे संचालक अतुल गर्ग यांनी याची माहिती दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.