Delhi : विहिंपची दिल्लीत ‘हितचिंतकां‘ना साद ! भाजपच्या मदतीला संघपरिवार

आगामी दिल्ली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषदेसह संघपरिवारातील संघटना विलक्षण सक्रिय झाल्या आहेत
Delhi Municipal Corporation
Delhi Municipal Corporationsakal
Updated on

नवी दिल्ली : आगामी दिल्ली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषदेसह संघपरिवारातील संघटना विलक्षण सक्रिय झाल्या आहेत. विहिंपने दिल्लीच्या आठङी जिल्ह्यांत आपल्या ‘हितचिंतकां‘ बरोबर संपर्क साधण्यासाठी एका मोहीमेची घोषणा कली आहे.. बजरंग दल, दुर्गा वाहिनी आदींचीही मदत या ‘हितचिंतक' मोहीमेत होईल. विहिंपचे हजारो कार्यकर्ते दिल्लीतील हिंदू समाजात राष्ट्रकार्याबाबत जागृती करतील असे सांगण्यात आले. या मोहीमेत विहिंपतर्फे दिल्लीत घरोघरी जाऊन धर्मांतर आणि लव्ह जिहाद थांबवण्यासाठी आणि घरवापसी करण्यासाठी विश्व हिंदू परिषद कशी कटिबद्ध आहे ही माहितीही देण्यात येणार आहे.

भाजप नेतृत्वाने आप नेत्यांच्या चौकशीसह सारे प्रयत्न करूनही महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाला सक्षम आव्हान देणे अत्यंत कठीण असल्याचे फीडबॅक आल्यावर संघपरिवाराने भाजपला मदतीचा हात देऊ केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दिल्लीकर आपच्या पाठीशी असल्याची परिस्थिती कायम राहिली तर आगामी काळात उरलेला संघपरिवारही दिल्लीत आणखी सक्रिय होण्याची शक्यता आहे.

विहिंप नेत्यांच्या माहितीनुसार या हितचिंतक अभियानात तब्बल ५००० विहिंप कार्यकर्ते दिल्लीत प्रत्येक ‘हिंदू‘ कुटुंबाशी थेट संपर्क साधणार आहे. ६ ते २० नोव्हेंबर या काळात दिल्लीतील हिंदू समाजातील प्रत्येक जात, धर्म, पंथ यांच्याशी संपर्क साधून त्यांना जोडणार आहे. प्रांत प्रचारप्रमुख नंदकिशोर शर्मा यांच्या नेतृत्वाखाली ही संपूर्ण मोहीम चालवली जाईल, २० हजार कार्यकर्त्यांची ५ हजार पथके बनविली गेली असून त्यांना किमान ५ लाख कुटुंबांशी थेट संपर्क साधून त्यांना विहिंपचे हिंतचिंतक म्हणून जोडा असे निर्देश देण्यात आले आहेत.सर्व क्षेत्रांतील सेलिब्रिटींसह डॉक्टर, अभियंते, चार्टर्ड अकाउंटंट, वकील, माजी न्यायाधीश, गायक, अभिनेते, खेळाडू इत्यादींना देखील या मोहीमेबरोबर जोडले जाईल.

विहिंपचा दावा आहे की जनसेवेसाठी विहिंपच्या कार्याचा विस्तार करणे हे हितचिंतक अभियानाचे उद्दिष्ट आहे. अधिकाधिक वंचित समाजाला सेवा कार्याशी जोडणे, सनातन धर्माचे संस्कार नवीन पिढीपर्यंत पोहोचवणे, गो रक्षण, सामाजिक एकोपा, महिला सक्षमीकरण, कौटुंबिक प्रबोधन, पर्यावरण संरक्षण तसेच मठ आणि मंदिरांची सुव्यवस्थित व्यवस्था तसेच हिंदू समाजाचे संघटन आणि संरक्षण करणे. संकल्पाची भावना जागृत करणे हेदेखील या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.

विहिंपचे सुरेंद्र गुप्ता, सुमीत अलग, बजरंग दलाचे भारत बत्रा, दुर्गा वाहिनीच्या अरुणा राठोड तसेच इंद्रजीत सिद्धू, नीतू आहुजा, मनोज शर्मा आदी या हिंतचिंतक मोहीमेचे संचालन करणाऱयांत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.