Delhi-Construction Site Ban: दिल्लीत बांधकामावर तात्पुरती बंदी; वाढत्या प्रदूषणामुळे निर्णय; ‘बीएस-३’ वाहनांनाही मनाई

बीएस-३ श्रेणीतील पेट्रोलच्या गाड्या तसेच बीएस-४ श्रेणीतील डिझेलच्या गाड्या पुढील आदेशापर्यंत दिल्ली एनसीआरमध्ये चालविता येणार नसल्याचे आदेश सरकारने दिले आहेत.
delhi ncr construction site ban temporarily pollution bs3 vehicle ban
delhi ncr construction site ban temporarily pollution bs3 vehicle banesakal
Updated on

नवी दिल्ली : वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात (एनसीआर) अनावश्यक बांधकामे आणि बीएस-३ श्रेणीची वाहने चालविण्यावर बंदी घातली आहे. बीएस-३ श्रेणीतील पेट्रोलच्या गाड्या तसेच बीएस-४ श्रेणीतील डिझेलच्या गाड्या पुढील आदेशापर्यंत दिल्ली एनसीआरमध्ये चालविता येणार नसल्याचे आदेश सरकारने दिले आहेत.

दिल्लीच्या काही भागातील हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) ४५० पर्यंत वाढला आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय करावे लागत असल्याचे हवा गुणवत्ता व्यवस्थापन विभागाने म्हटले आहे. हवेची गुणवत्ता लक्षात घेऊन वेळोवेळी ग्रेडेड रिस्पॉन्स ऍक्टिश  प्लॅननुसार (जीआरएपी) प्रतिबंधात्मक उपाय योजले जातात.

अनावश्यक बांधकामांवर बंदी घालण्यात आली असली तरी राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित बांधकामे, आरोग्य, संरक्षण, रेल्वे, मेट्रो, विमानतळ, आंतरराज्य बस टर्मिनल, महामार्ग, पूल, पॉवर ट्रान्समिशन, पाइपलाइन, स्वच्छता प्रकल्प, पाणीपुरवठा क्षेत्राशी संबंधित कामांना बंदीतून वगळण्यात आले आहे.

दिल्ली एनसीआर क्षेत्रात एकीकडे पारा ३ अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरला आहे, तर दुसरीकडे प्रदूषणही वाढले आहे. रात्री आणि सकाळच्या वेळी पडणाऱ्या दाट धुक्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दरम्यान दिल्लीला लागून असलेल्या नोएडा येथे शाळांची सुटी आणखी दोन दिवसांसाठी वाढविण्यात आली आहे.

देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर भारतात थंडीची लाट आली असून आज उत्तर भारतातील मैदानी प्रदेशात दाट धुक्याची चादर पसरली होती. अनेक ठिकाणी दृश्यमानताही शून्य मीटरपर्यंत खाली घसरली होती. त्यामुळे, अनावश्यक प्रवास टाळण्याचा तसेच वाहन चालविताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला हवामान खात्याने लोकांना दिला.

दाट धुक्यामुळे दिल्लीला येणाऱ्या २२ रेल्वेंचे वेळात्रकही विस्कळित झाले. पंजाब आणि उत्तर राजस्थानपासून ईशान्येपर्यंच्या भागात पसरलेली ही धुक्याची चादर एवढी दाट होती, की उपग्रहानेही त्याची प्रतिमा टिपली.

पूर्व किनाऱ्यावरील धुकेही या प्रतिमेत दिसले. हवामान विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले, की शनिवारी (ता. १३) रात्री दहापासून धुक्याने पंजाब, हरियाना, दिल्ली, उत्तर राजस्थान आणि उत्तर प्रदेशपर्यंतचा भाग आपल्या कवेत घेतला.

यंदाच्या हिवाळ्यात अमृतसर ते दिब्रूगडदरम्यानच्या गंगानगर, अंबाला, चंडीगड, दिल्ली, लखनौ, वाराणसी, प्रयागराज, तेजपूर आदी प्रमुख शहरांत प्रथमच शून्य दृश्यमानतेची नोंद झाली. त्याचप्रमाणे, या हिवाळ्यातील हे सर्वाधिक काळ टिकणारे धुके ठरले. त्याची तीव्रताही सर्वाधिक होती. वाहनचालकांनी वाहने चालविताना काळजी घ्यावी तसेच धुक्याच्या दिव्यांचा वापर करावे असे आवाहन त्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.