नवी दिल्ली : दिल्लीच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांनी आपल्याला मुख्यंमत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी बेदम मारहाण केल्याचा आरोप केला होता. मुख्यमंत्र्यांचे पीए विभव कुमार यांच्याकडून मारहाण झाल्याचे आरोप त्यांनी केले होते. पण आता त्यांच्यावर आपकडून पलटवार करण्यात आला आहे. स्वाती मालिवाल या भाजपच्या षडयंत्राचा एक भाग आहेत, असा घणाघाती आरोप आपकडून करण्यात आला आहे. (Delhi News Swati Maliwal part of BJP conspiracy heavy accusations from AAP leader Atishi)
आपच्या प्रवक्त्या आतिषी यांनी आज पत्रकार परिषदेत घेऊन मालिवाल यांच्यावर घणाघाती आरोप केलेत. त्यांनी म्हटलं की, "जेव्हापासून अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळाला आहे. तेव्हापासून भाजपचा तिळपापड झाला आहे. तेव्हापासून भाजपनं एक षडयंत्र रचलं, त्या षडयंत्राचा एक भाग म्हणून स्वाती मालिवाल यांना १३ मे रोजी सकाळी सकाळी अरविंद केजरीवाल यांच्या घरी पाठवण्यात आलं. स्वाती मालिवाल या षडयंत्राचा चेहरा आणि मोहराही होत्या.
मालिवाल या अपॉईंटमेंटशिवाय मुख्यमंत्र्यांच्या घरी पोहोचल्या, त्यांचा इरादा होता की मुख्यमंत्र्यांवर आरोप लावावेत. पण मुख्यमंत्री त्यावेळी घरी उपस्थित नव्हते त्यामुळं ते वाचले. त्यानंतर मालिवाल यांनी विभव कुमार यांच्यावर आरोप केले. पण आज एक व्हिडिओ समोर आला तो मुख्यमंत्री निवासस्थानातील ड्राईंग रुममधला आहे. त्या व्हिडिओनं स्वाती मालिवाल यांचा खोटेपणा संपूर्ण देशासमोर ठेवला आहे.
मालिवाल यांनी एफआयआर दाखल करताना जी तक्रार दिली होती त्यात त्या म्हणतात, "त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यांच्या डोक्याला जखम झाली आहे, त्यामुळं दुखत असल्यानं त्यांना बोलताही येत नव्हतं. आपलं डोकं टेबलवर आपटल्यानं डोकं फुटलं. आपले कपडे फाडले गेले असाही आरोप त्यांनी केला.
पण आजच्या व्हिडिओत हे स्पष्टपणे दिसतंय की, यामध्ये त्या ड्राईंगरुममध्ये आरामशीर बसल्या आहेत. पोलिसांशी त्या अरेरावी करत आहेत, विभव कुमारसोबतही त्यांनी धमकी देत आहेत. त्यांचे कपडे कुठेही फाटलेले नाहीत. त्यांच्या डोक्याला कुठेही जखम झाल्याचं या व्हिडिओत दिसत नाहीए, असं आतिषी यांनी सांगितलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.