Delhi Ordinance Bill: दिल्ली अध्यादेश विधेयक आजच राज्यसभेत येणार?, AAPनं काढला व्हिप!

ज्या पद्धतीनं हे विधेयक संसदेत सादर होणार आहे ते असंविधानिक असल्याचा आरोप आपनं केला आहे.
Raghav Chhaddha
Raghav Chhaddha
Updated on

नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली सरकार (संशोधन) अध्यादेश २०२३ हे विधेयक आजचं राज्यसभेत मांडण्यात येणार असल्याचं आम आदमी पार्टीनं म्हटलं आहे. तसेच आज ज्या पद्धतीनं हे विधेयक संसदेत सादर होणार आहे ते असंविधानिक असल्याचा आरोप आपनं केला आहे. तसेच आपल्या सर्व खासदारांना सभागृहात हजर राहण्यासाठी व्हिप देखील काढण्यात आला आहे. (Delhi Ordinance Bill will be presented in the Rajya Sabha today says AAP Whip out)

आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढा म्हणाले, दिल्लीच्या अध्यादेशावरील विधेयक आज संसदेत मांडलं जाण्याची शक्यता आहे. हे विधेयक केवळ देशाविरोधातच नाही तर दिल्लीतील १.२ कोटी जनतेच्या विरोधात आहे. भाजपचं दिल्लीतून अस्तित्वच नष्ट झालं आहे, त्यामुळं त्यांच्या हायकमांडंनं आता दिल्ली उद्धवस्त करायचं ठरवलं आहे.

Raghav Chhaddha
Jaipur-Mumbai Exp Firing: गोळीबार, चेन पुलिंग अन् अटक; एक्स्प्रेसमध्ये नेमकं काय घडलं? रेल्वे अधिकाऱ्यांची माहिती

आपनं काढला व्हिप

विधेयक कुठल्याही क्षणी राज्यसभेत दाखल होऊ शकतं याची शक्यता लक्षात घेत आम आदमी पार्टीनं व्हिप काढला आहे. त्यानुसार, ३१ जुलै ते ४ ऑगस्ट २०२३ दरम्यान सकाळी ११ ते सभागृहाचं कामकाज संपेपर्यंत हजर रहावं असं म्हटलं आहे. म्हणजेच आजच्या दिवसापासून पुढील चार दिवसांत हे विधेयक कधीही मांडलं जाऊ शकतं असं आपचं म्हणणं आहे.

कायदा मंत्र्यांचं म्हणणं काय?

दरम्यान, आजच्या कामकाजाच्या लिस्टमध्ये ज्या विधेयकांचा समावेश आहे, ते सादर होतील. जेव्हा दिल्लीच्या अध्यादेशाचं विधेयक लिस्टमध्ये येईल त्यावेळी त्याची माहिती दिली जाईल, अशी माहिती यावेळी अर्जुन मेघवाल यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.