पीडितेनं एअर इंडियाला दिलेल्या तक्रारीच्या आधारे भारतीय दंड संहिता आणि विमान नियमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवी दिल्ली : न्यूयॉर्क-दिल्ली असा प्रवास करणाऱ्या विमानात (New York-Delhi Flight) महिला प्रवाशावर (Women Passenger) लघवी करणाऱ्या प्रवाशाला 30 दिवसांसाठी प्रवास करण्यास बंदी घालण्यात आलीये. तसंच, दिल्ली पोलिसांनी त्याच्याविरुध्द एफआयआर दाखल केला आहे.
न्यूयॉर्कहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या (Air India) विमानात महिला प्रवाशावर लघवी करणाऱ्या प्रवाशाला पकडण्यासाठी अनेक पथकं तयार करण्यात आली आहेत, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, पीडितेनं एअर इंडियाला दिलेल्या तक्रारीच्या आधारे भारतीय दंड संहिता आणि विमान नियमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहिता कलम 294 (सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य), 354 (महिलेचा विनयभंग करण्याच्या हेतूनं तिच्यावर हल्ला करणं किंवा बळजबरी करणं), 509 (महिलेचा विनयभंग करण्याच्या हेतूनं अश्लील शब्द, हावभाव किंवा कृत्य करणं) आणि 510 (दारूच्या नशेत असलेल्या व्यक्तीकडून सार्वजनिकपणे दुष्कृत्य करणं), तसंच विमान नियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'महिलेच्या अंगावर लघवी करणाऱ्या आरोपी प्रवाशाचा शोध घेण्यासाठी आम्ही अनेक पथकं तयार केली असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल. लघवी केल्याचा आरोप असलेल्या प्रवाशाचं नाव शेखर मिश्रा असून तो मुंबईतील रहिवासी असल्याचं समजतं. आरोपीच्या अटकेसाठी छापेमारी सुरू असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल.' दरम्यान, 'गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये (2022) न्यूयॉर्कहून दिल्लीला येणा-या विमान प्रवासादरम्यान सहप्रवाशावर लघवी करणाऱ्या प्रवाशावर पुढील 30 दिवसांसाठी प्रवास बंदी घालण्यात आलीये.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.