Delhi Police officer: रस्त्यावर नमाज पढणाऱ्यांना लाथ मारणे पडले महागात; पोलीस अधिकाऱ्यावर झाली कारवाई

Police kicking men offering namaz: मिळालेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले असून त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे.
delhi police namaz
delhi police namazesakal
Updated on

नवी दिल्ली- रस्त्यावर नमाज पढणाऱ्या मुस्लीम समाजाच्या एका गटाला एक पोलीस अधिकारी लाथ मारत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. यानंतर पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले असून त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे.

शुक्रवारी मुस्लीम समजाचे काही लोक वर्दळीच्या रस्त्यावर नमाज पढत होते. यावेळी दिल्लीच्या इंद्रलोक भागातील एक अधिकारी तेथे येतो आणि त्यांना हटवण्यासाठी त्यांना लाथा मारायला सुरुवात करतो. ३४ सेकंदाचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. (Delhi Police officer has been suspended after he was seen kicking and assaulting a small group of men offering namaz)

delhi police namaz
Viral Video: हृदयस्पर्शी प्रसंग...बर्फवृष्टी सुरु असताना नमाज अदा करणाऱ्या मुस्लिम माणसासाठी शीख युवक बनला 'छत'

निलंबन आणि शिस्तभंगाची कारवाई

इंद्रलोक भागातील एका मशिद परिसरात काही लोक रस्त्यावर नमाज पढत होते. यावेळी त्यांना रस्त्यावरुन हटवण्यासाठी पोलीस अधिकाऱ्याने त्यांना लाथा मारल्या. एकाच्या मानेवर देखील मारल्याचं व्हिडिओमधून दिसत आहे. यानंतर लोक जमा झाले. पोलीस अधिकारी आणि जमावामध्ये बाचाबाची होत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय.

डेप्युटी पोलीस कमीशनर (दिल्ली उत्तर) एमके मीना यांनी सांगितलं की, शुक्रवारी हा प्रकार घडला आहे. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे तात्काळ निलंबन करण्यात आले आहे. शिवाय त्याच्याविरोधात आवश्यक ती शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. सूत्रांच्या माहितीनुसार, विभागाअंतर्गत चौकशी देखील सुरु करण्यात आली आहे.

delhi police namaz
मुस्लिमांनी आता ज्ञानवापी मशिदीत नमाज पढू नये, कारण...; आचार्य सत्येंद्र दास यांनी दिला शरियतचा दाखला

मशिदीमध्ये जागा नव्हती म्हणून...

संतापलेल्या लोकांनी रस्ता अडवून संबंधित पोलीसावर कारवाई करण्याची मागणी केली होती. माहितीनुसार, मशिदीमध्ये जागा नव्हती. त्यामुळे मुस्लीम समाजातील लोक रस्त्यावर येऊन नमाज पढत होते. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दिल्ली काँग्रेसने या प्रकारावरुन टीका केली आहे. नमाज पढणाऱ्या लोकांना लाथ मारण्यासारखे आणखी लाजिरवाणे काय असू शकते, असं काँग्रेसने म्हटलंय.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.