G20 Summit: जी-20 परिषदेच्या बैठकीसाठी दिल्ली झाली 'अभेद्य किल्ला'; कशी आहे राजधानीची सुरक्षा व्यवस्था?

राजधानी दिल्ली जी 20 परिषदेसाठी येणाऱ्या पाहुण्यासाठी सज्ज झाली आहे
G20 Summit
G20 SummitEsakal
Updated on

राजधानी दिल्ली जी 20 परिषदेसाठी येणाऱ्या पाहुण्यासाठी सज्ज झाली आहे. जगातील ताकदवर देशाचे प्रमुख राजधानी दिल्ली येथे असल्यामुळे सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. दिल्लीत येणाऱ्या पाहुण्यांसाठी 50 हजार सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

जी 20 परिषद प्रगती मैदानावरील भारत मंडपम याठिकाणा होणार आहे. या मैदानाखाली असलेल्या टनेलच्या खाली श्वान पथकासह कमांडोजला तैनात करण्यात आलं आहे. त्याचबरोबर परदेशी पाहुण्यासाठी ज्या 5 स्टार हॉटेलमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. त्या हॉटेलवर नो फ्लाई झोन घोषित करण्यात आला आहे. यासह केमिकल वेपन सह बायो वेपनच्या विरोधात लढण्याची तयारी देखील करण्यात आली आहे.

कशी असेल सुरक्षा व्यवस्था?

दिल्ली पोलिसांच्या 50 हजार जवानांसह, पॅरामिलिट्री फोर्स, एनएसजी आणि सीआरपीएफ कमांडो तैनात करण्यात आले आहेत. दिल्लीतील उंच इमारतीवर एअरक्राफ्ट गन मशिन लावण्यात आल्या आहेत. प्रत्येक घटनेवर नजर ठेवण्यासाठी 40,000 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. महत्त्वाच्या ठिकाणी फेस फेस रेकगनिशन कॅमेरे तैनात करण्यात आले आहेत. राजधानी दिल्लीमध्ये एंटी ड्रोन सिस्टीम तैनात करण्यात आली आहे.

G20 Summit
बंगळूर विमानतळावर सुटकेसमध्ये आढळली अजगर, साप, माकडांची तब्बल 70 पिल्लं; थायलंडहून आलेल्या वन्यजीव तस्कराचा पर्दाफाश

तर संभावित धोके ओळखून प्रत्येक हॉटेलमधून पाहुण्यांना काढण्यासाठी वायुसेनाचे चॉपर तयार ठेवण्यात आले आहे. सायबर हल्ल्याच्या दृष्टीकोनातून यंत्रणा तयार करण्यात आली आहे. हवेतून होणाऱ्या धोक्याचा विचार करता दिल्लीत मिसाईल तैनात करण्यात आले आहे.

जागतिक सुरक्षा यंत्रणांसह गुप्तचर यंत्रणांचंही लक्ष

दिल्ली पोलिस, पॅरामिलिट्री फोर्स, एनएसजी, सीआरपीएफ, आईबी आणि रॉ पासून ब्रिटेन ची एमआई6, रशिया ची केजीबी, अमेरिकेची सीआईए आणि इजरायलच्या मोसादसारख्या जागतीक गुप्तचर यंत्रणाचं भारतातील जी 20 परिषदेवर नजर असणार आहे.

G20 Summit
G20 Summit 2023 : बायडन आज PM मोदींसोबत करणार डिनर; दोन्ही नेत्यांमध्ये 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा

कोणता नेता कुठं थांबणार आणि दिल्लीत कधी पोहोचणार?

अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन- आईटीसी मौर्या - आज सायंकाळी 6:55 वाजता

इग्लंडचे पंतप्रधान ऋषि सुनक- हॉटेल शांगरी - आज दुपारी 1.40 वाजता

कॅनाडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो- द ललित हॉटेल - आज सायंकाळी 7 वाजता

फ्रांसचे राष्ट्रपती इमैनुएल मैक्रो- क्लैरिजेस हॉटेल - आज दुपारी 12.35 वाजता

जपान चे पंतप्रधान फिमियो किशिदो- द ललित हॉटेल - आज दुपारी 2.15 वाजता

G20 Summit
Bypoll Result 2023 : 'इंडिया विरुद्ध एनडीए', कोण मारणार बाजी? विधानसभा पोटनिवडणुकीच्या ७ जागांचे निकाल आज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.