जीवे मारण्याच्या धमकीनंतर नुपूर शर्मांना दिल्ली पोलिसांकडून सुरक्षा

एका टिव्ही शोवरील मुलाखतीदरम्यान शर्मा यांनी प्रेक्षित मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त विधान केले होते.
maldives parliament rejects motion that sought condemnation of bjp nupur sharma remarks on prophet
maldives parliament rejects motion that sought condemnation of bjp nupur sharma remarks on prophet
Updated on

नवी दिल्ली : प्रेषित मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या आरोपावरून भारतीय जनता पक्षातून निलंबित करण्यात आलेल्या प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिल्ली पोलिसांनी सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. वादग्रस्त विधानानंतर आपल्याला व कुटुबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात येत असल्याची तक्रार शर्मा यांनी केली होती. त्यांच्या या तक्रारीची दखल घेत दिल्ली पोलिसांनी शर्मा व त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. (Nuprur Sharma News)

maldives parliament rejects motion that sought condemnation of bjp nupur sharma remarks on prophet
नुपूर शर्मा आणि नवीन कुमार यांची पक्षातून हकालपट्टी, आखाती देशांमध्ये वातावरण तापलं

एका टिव्ही शोवरील मुलाखतीदरम्यान शर्मा यांनी प्रेक्षित मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त विधान केले होते. यानंतर दोन समाजातील गटांमध्ये कानपूर येथे हिंसाचार घडला होता. तसेच देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापून उठले होते. वाढत्या विरोधानंतर भाजपकडून नुपूर शर्मा आणि नवीन जिंदल यांची पक्षातून हकापट्टी करण्यात आली. दरम्यान, वादग्रस्त विधानानंतर शर्मा आणि त्यांच्या कुटुबियांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात येत होत्या. त्यानंतर शर्मा यांनी पोलिसांना सुरक्षा पुरवण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीची दखल घेत दिल्ली पोलिसांनी शर्मा यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.

maldives parliament rejects motion that sought condemnation of bjp nupur sharma remarks on prophet
‘मी माझे शब्द परत घेते’ निलंबित नूपुर शर्मा यांचे ट्विट

प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यावर भारतातूनच नव्हे तर, आखाती देशांकडूनदेखील तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय प्रेषित महम्मद पैगंबर यांच्याबद्दल अवमानजनक वक्तव्य केल्याबद्दल नुपूर शर्मा यांच्याविरुद्ध मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी शर्मा यांना समन्स बजावत 22 जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. रझा अकादमीने दिलेल्या तक्रारीवरून मुंबईतील पायधुनी पोलीस ठाण्यात नुपूर शर्मा यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

भाजपकडून स्पष्टीकरण

दरम्यान, भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित महंमद पैगंबर यांच्याबद्दल काढलेल्या अनुद्गार प्रकरणी भाजपने हात झटकले आहेत. कोणत्याही धर्माचा किंवा धार्मिक व्यक्तीचा अपमान भाजप निंदनीय मानतो, अशा शब्दांत भाजपने पक्षाचे भूमिका स्पष्ट केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.