Delhi Crime News: आंतरराष्ट्रीय दहशतवादी, गँगस्टर अर्शदीप सिंह डालाचे दोन शार्पशूटर राजप्रीत सिंग उर्फ राजा उर्फ बंब आणि वीरेंद्र सिंह उर्फ विम्मी यांना दिल्ली पोलिसांनी अक्षरधाम मंदिर, मयूर विहारच्या दिशेने मुख्य रस्त्यावरून गोळीबारानंतर अटक केली. दोन्ही गुन्हेगारांना अर्शदीपने एली मंगट नावाच्या गायिकेची हत्या करण्याचे काम दिले होते. ज्यासाठी त्यांनी भटिंडा येथे ऑक्टोबर 2023 मध्ये प्रयत्न केला होता. मात्र ते अयशस्वी झाले, दिल्लीचे विशेष पोलिस आयुक्त एचजीएस धालीवाल यांनी ही माहिती दिली.
आरोपींनी अटकेदरम्यान पोलिसांवर पाच राऊंड गोळीबार केला. यातील दोन राउंड पोलिसांच्या बुलेटप्रूफ जॅकेटला लागल्या. प्रत्युत्तरादाखल पोलीस पथकाने आरोपींवर सहा राऊंड गोळीबार केला. आरोपींच्या ताब्यातून एक रिव्हॉल्व्हर, 30 एमएम पिस्तूल 07 जिवंत काडतुसेसह एक हँडग्रेनेड आणि चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे. (Delhi Crime News)
खलिस्तानी दहशतवादी अर्शदीप सिंह उर्फ डालाचे साथीदार - राजप्रीत सिंग उर्फ राजा उर्फ बंब, सचिन भाटी, अर्पित आणि सुनील प्रधान, यांना चार दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवण्यात आले आहे. तसेच चकमकीत जखमी झालेल्या वीरेंद्र सिंह उर्फ विम्मीला दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
दोन्ही शार्प शूटर कोण आहेत?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजप्रीत सिंह उर्फ राजा हा पंजाबमधील फिरोजपूरचा रहिवासी असून तो खलिस्तानी दहशतवादी अर्शदीपचा खास शूटर आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात अर्शदीपच्या सांगण्यावरून राजप्रीत सिंहने त्याच्या साथीदारांसह पंजाबमध्ये परमजीत सिंगची हत्या केली होती. ज्यामध्ये तो वॉन्टेडही होता. याशिवाय 2017 मध्ये राजप्रीत फिरोजपूर येथील खुनाच्या प्रयत्न प्रकरणातही सहभागी होता आणि याच प्रकरणात तो पॅरोलवर फरार होता. (Latest Marathi News)
याशिवाय शूटर वीरेंद्र सिंह हा पंजाबमधील भटिंडा येथील रहिवासी आहे. हा देखील अर्शदीप डालाच्या खास नेमबाजांपैकी एक आहे. अर्शदीपच्या सांगण्यावरून शूटर वीरेंद्रने पंजाबमधील एका ज्वेलर्सवर गोळीबार केला होता आणि त्याच्याकडे खंडणीची मागणी केली होती. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने खलिस्तानी दहशतवादी अर्शदीपच्या या दोन शार्प शूटर्सविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पंजाबी गायिका एली मंगट व्यतिरिक्त कोणता मोठा गुन्हा करण्यासाठी हे दोघे दिल्लीत आले होते, याची चौकशी केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.