हिजबुलच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याला दिल्लीत अटक, काश्मीरमधील अनेक घटनांमध्ये होता मुख्य सुत्रधार

दिल्लीत हिजबुल मुजाहिद्दीनच्या एका मोस्ट वाँटेड दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. या दहशतवाद्यावर 5 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
delhi police
delhi police
Updated on

Crime News: दिल्लीत हिजबुल मुजाहिद्दीनच्या एका मोस्ट वाँटेड दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. या दहशतवाद्यावर 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. जम्मू-काश्मीरमधील अनेक दहशतवादी घटनांमध्ये तो वॉन्टेड होता.

काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी घटना घडवून तो भूमिगत झाला होता. गुरुवारी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने या दहशतवाद्याला अटक केली. जावेद अहमद मट्टो असे अटक केलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. एनआयएचे पथकही त्याच्या शोधात होते, दिल्ली पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे.

delhi police
Rashmi Shukla: महाराष्ट्राला मिळाल्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक; रश्मी शुक्लांच्या नियुक्तीची अखेर घोषणा

दिल्लीचे विशेष पोलिस आयुक्त एच जी एस धालीवाल म्हणाले, "दिल्ली पोलिसांच्या विशेष सेल आणि केंद्रीय एजन्सींच्या समन्वयाने जावेद मट्टू, जो A++ श्रेणीचा दहशतवादी आहे. याला अटक केली आहे. त्याच्यावर 10 लाख रुपयांचे बक्षिस होते. त्याच्या ताब्यातून एक पिस्तूल, मॅगझिन आणि चोरीचे वाहन जप्त करण्यात आले.

"पोलीस कोठडी घेतल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेल्या 5 ग्रेनेड हल्ल्यांमध्ये त्याचा हात होता. वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 पोलीस कर्मचार्‍यांच्या हत्येत सामील आहे, या घटनांमध्ये १२ पोलीस कर्मचारी जखमी झाले होते," असे धालीवाल म्हणाले.

हिजबुलचा कमांडर जावेद अहमद मट्टो हा पाकिस्तानात देखील गेला होता. तो सोपोरचा रहिवासी आहे. अलीकडेच सोपोरमध्ये त्याच्या भावाने घरावर तिरंगा ध्वज फडकावला होता जो खूप व्हायरल झाला होता. (Latest Marathi News)

delhi police
Photos: मोदींचा एक उनाड दिवस! समुद्रात डुबकी, स्नॉक्लिंग अन् बीचवर फेरफटका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.