Delhi Rain : दिल्लीत पावसाची रिपरिप; जानेवारीतील रेकॉर्डब्रेक

दिल्लीच्या आसपासच्या प्रदेशात पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता आहे.
Raining
Raining
Updated on

नवी दिल्ली - सध्या थंडीचा हंगाम सुरु आहे. देशाभरातील (Desh News) अनेक ठिकाणी यावर्षीही तापमानाने उच्चांकी आकडा गाठला आहे. त्यामुळे अनेक प्रदेशातील थंडी वाढली आहे. दरम्यान राजधानी दिल्लीतही ही परिस्थिती कायम आहे. जानेवारी महिना संपत आला असला तरीही थंडीचा तडाखा कायम असल्याने दिल्लीकर आश्चर्य व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे या महिन्यात दिल्लीत थंडीसह काही भागात पाऊसही पडत आहे. (Delhi rainfall) एनसीआरमध्ये आज सकाळपासून हलक्या पावसाच्या हलक्या सरींनी सुरुवात केली आहे. हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत आज 68 मिमी पावसाची नोंद झाली आहे. 1995 नंतरती ही जानेवारी महिन्यातील सर्वाधिक पावसाची नोंद असल्याची माहिती समोर आली आहे. या पावसाने मागील २७ वर्षांचा रेकॉर्ड तोडले आहे.

Raining
पुण्यातील शाळा बंदच राहणार, अजित पवारांच्या बैठकीनंतर मोठा निर्णय

पश्चिम भागात पावसाची रिपरिप

भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार दिल्लीच्या आसपासच्या प्रदेशात पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता आहे. दिल्लीतील विविध भागांमध्ये आज 11.5 अंश सेल्सियस तापमानाची नोंद आहे. जे या हवामानाच्या सरासरी तापमानापेक्षा वाढले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी आठपासून पावसाला सुरवात झाली आहे. या माहितीनुसार दिल्लीच्या पश्चिमेला असणाऱ्या राज्यात म्हणजे पंजाब, हरियाणा, दिल्ली पश्चिम, उत्तर प्रदेश आणि उत्तर राजस्थानात 23 जानेवारीच्या दरम्यान पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या प्रदेशातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Raining
भाजप सदस्यत्वाचा राजीनामा; उत्पल पर्रिकरांचे नारायण राणेंना पत्र

दिल्लीचे वातावरण बिघडले

हवामान विभागानुसार, शनिवारी सकाळी साडेआठच्या दरम्यान, हवेतील तापमानाच्या पातळीत काही प्रमाणात घसरण झाली आहे. येथे कमाल तापमान 16 अंश सेल्सियसच्या आसपास होते. दरम्यान, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या आकडेवारीनुसार शनिवार दिल्लीतील वातावरण वेगळ्या श्रेणीत जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()