Delhi Rain Update: दिल्लीतील पावसाने मोडला 41 वर्षांचा विक्रम, 24 तासात 153 मिमी पाऊस

Delhi Rain Update
Delhi Rain Update
Updated on

Delhi Rain Update: दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे दिल्लीतील सर्व रस्ते आणि वसाहतींमध्ये पाणी साचले आहे. हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि पंजाबसह देशातील उत्तरेकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे.

दिल्लीत मुसळधार पावसाने 41 वर्षांचा विक्रम मोडला आहे. IMD च्या आकडेवारीनुसार, 1982 पासून, जुलैमध्ये एका दिवसात सर्वाधिक 153 मिमी पाऊस पडला.

यापूर्वी 25 जुलै 1982 रोजी 169.9 मिमी पावसाची नोंद झाली होती. 2003 मध्ये 24 तासांत 133.4 मिमी पाऊस झाला होता. तर 2013 मध्ये दिल्लीत 123.4 मिमी पाऊस पडला होता. दरम्यान आता 9 जुलै 2023 दिल्लीतील पावसाने 14 वर्षाचा रेकॉर्ड मोडला आहे. 24 तासात 153 मिमी पाऊस पडला आहे.

Delhi Rain Update
Supreme Court on NPS:सुप्रिम कोर्टाचा निमलष्करी दलांना धक्का, जुन्या पेंशन योजनेवर महत्वाचा निर्णय

पाऊस अद्यापही थांबलेला नाही. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, दिल्ली-एनसीआरमध्ये आज (रविवार), 9 जुलै रोजीही मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

1982 नंतर पहिल्यांदाच एका दिवशी पडला 153 मिमी पाऊस पडला. दिल्ली, हिमाचल, पंजाबसह उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. जम्मू-कश्मीर च्या पुंछ सेक्टरमध्ये सेनेचे दोन जवान पोशाना नदी पार करताना बुडाले.

हिमाचल प्रदेश मध्ये 5, जम्मू कश्मीर मध्ये 2 आणि उत्तर प्रदेशमध्ये 4 लोकांचा पावसामुळे मृत्यू झाला आहे. तर हिमाचल प्रदेशमध्ये शाळांना दोन दिवसाची सुट्टी देण्यात आली आहे.  (Delhi Rain)

Delhi Rain Update
Ajit Pawar : मोहीम फत्ते! अजित पवारांच्या खास विश्वासू माणसाने गायब झालेल्या 'त्या' आमदाराला रात्रीतूनच उचललं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.