देशाच्या अनेक राज्यांत यावर्षी जोरदार पाऊस सुरु असून काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे (Heavy rain) दरड कोसळण्याच्या घटना सुद्धा घडल्या आहेत. त्यातच आता राजधानी दिल्लीत (Delhi) सुद्धा आज दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसुन आले आहे. तब्बल ६ तास धुवांधार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी रस्ते तुंबल्याचे पहायला मिळते आहे. दिल्लीतील मिंटो ब्रिज, आईटीओसह विमानतळ परिसरात जोरदार पाऊस झाला. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज सुद्धा दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि राजस्थानमधील (Rajasthan) अनेक ठिकाणी विजांच्या कडकडासह मध्यम आणि मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. दिल्लीच्या मुनिरका परिसरात रस्त्यावर पाणी तुंबल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. दिल्ली आणि आजुबाजूच्या परिसरात ढगांच्या गडगडाटात जोरदार पाऊस होण्याची शक्यता असल्याने हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर नॉएडा, ग्रेटर नॉएडा, गाझियाबादमध्ये सुद्धा पावसाचा जोर राहील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दिल्ली व्यतिरीक्त नॅशनल कॅपीटल रीजन परिसरातील गुरुग्राम, मानेसर, फरीदाबाद, बल्लभगड, तोशाम, भिवानी, झज्जर, नरनौल, महेंद्रगड आणि कोसाईमध्ये पुढच्या काही तासांत जोरदार पावसाची शक्यता आहे. उत्तरप्रदेशमध्ये सुद्धा पहासू, सियाना, खुर्जा, बागपत, मोदीनगर, हापुड, बुलंदशहर, पिलखुओ, मेरठ भागांत पावसाचा मोठा फटका बसला आहे. राजस्थानच्या विराटनगर, कोटपुतली, भिवाडी, लक्ष्मणगड, नादबाई, नागर, अलवर, तिजारा, डीग सारख्या परिसरातसुद्धा पाऊस सुरु आहे.
दरम्यान, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणामध्ये मागच्या दोन दिवसांपासुन पाऊस सुरु असल्याने तापमान कमी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. अनेक ठिकाणी काल तापमान २६-२७ डिग्री सेल्सियस पर्यंत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.