उष्णतेपासून दिल्लीकरांना दिलासा, राजधानीत सकाळपासून पावसाला सुरुवात

दिल्लीकरांना उष्णतेपासून दिलासा, सकाळपासून पावसाची रिपरिप सुरु, वातावरणात गारवा
Raining
Raining
Updated on
Summary

दिल्लीकरांना उष्णतेपासून दिलासा, सकाळपासून पावसाची रिपरिप सुरु, वातावरणात गारवा

जून महिना संपत आला तरी म्हणावी तशी पावसाने सरासरची नोंद गाठलेली नाही. यंदा मृग नक्षत्र कोराडाच गेला. दरम्यान, अनेक पिकांची लागवड खोळंबली आहे. मात्र या लांबलेला मान्सूनचा पाऊस अखेर दिल्लीत दाखल झाला आहे. त्यामुले दिल्लीकर सुखावले आहेत. दिल्लीत सकाळपासूनच चांगल्या पावसाला सुरुवात झाली असून अनेक भागात जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे दिल्लीकरांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे.

राजधानी शहर दिल्लीतील बुरारी, शाहदरा, पटपरगंज, आयटीओ क्रॉसिंग आणि इंडिया गेट या भागात चांगला पाऊस झाला. 29 जूनपासून राजधानी दिल्लीत हवामानात बदल होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली होती. त्यानुसार आज (30 जून) सकाळपासूनच दिल्लीच्या बहुतांश भागात पावसानं हजेरी लावली आहे.

Raining
काळ सर्वात शक्तिशाली गोष्ट.., सोशल मीडियावर जनतेचे 'बहुमत' उद्धव ठाकरेंना

आज सकाळपासून पावसाच्या सरी कोसळत असल्याने उष्णतेपासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सध्या दिल्लीतील द्वारकेपासून गाझियाबादपर्यंत पाऊस पडत आहे. तर अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून कधीही पाऊस पडू शकतो. संततधार पावसामुळं शहरातील काही भागातील रस्त्यावर पाणी साचले आहे.

दरम्यान, हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मान्सून आज संपूर्ण उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीर, राजस्थानचा काही भाग, संपूर्ण दिल्ली, पंजाब आणि हरियाणाच्या काही भागात पुढे सरकला आहे. मान्सूनच्या पहिल्या 10 दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 30 जून ते 1 जुलै दरम्यान मान्सून दिल्ली एनसीआरमध्ये दाखल होईल, असा अंदाज विभागानं बुधवारी वर्तवला होता.

Raining
'उखाड दिया..', ठाकरे सरकार पडल्यानंतर संजय राऊत नेटकऱ्यांच्या निशाण्यावर

हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या दोन दिवसांत महाराष्ट्रातील काही भागांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये विदर्भातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट तर कोकणला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, या पावसाचा मध्य महाराष्ट्रात फारसा प्रभाव असणार नाही असही हवामान खात्यानं सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.