Medha Patkar : मेधा पाटकर यांच्या अडचणी वाढल्या; दिल्लीच्या साकेत कोर्टाने ठरवलं दोषी, व्हीके सक्सेना यांची याचिका

मेधा पाटकर आणि दिल्लीचे विद्यमान नायब राज्यपाल सक्सेना हे २००० सालापासून कायदेशीर लढाई लढत आहेत. तेव्हा मेधा पाटकर यांनी आपल्या नर्मदा बचाव आंदोलनाच्या विरोधात जाहिरात प्रसिद्ध केल्याप्रकरणी व्हीके सक्सेना यांच्याविरोधात खटला दाखल केला होता.
Medha Patkar
Medha Patkaresakal
Updated on

Medha Patkar Defamation Case : दिल्लीतल्या साकेट कोर्टाने शुक्रवारी सामाजिक कार्यकर्त्या आणि नर्मदा बचाओ आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांना मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवलं आहे. त्यांच्याविरोधात तत्कालीन केव्हीआयसीचे अध्यक्ष व्हीके सक्सेना यांच्यावतीने याचिका दाखल करण्यात आलेली होती.

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, साकेत कोर्टाचे मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेट राघव शर्मा यांनी पाटकर यांना मानहानीप्रकरणी दोषी ठरवले. कायद्यानुसार त्यांना दोन वर्षांचा तुरुंगवास किंवा दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

Medha Patkar
Pune Porsche Accident : पोलिसांमध्येच नव्हता ताळमेळ, घटनास्थळी जाऊनही....; निष्काळजीपणा भोवणार? २ पोलिसांवर कारवाई होण्याची शक्यता

मेधा पाटकर आणि दिल्लीचे विद्यमान नायब राज्यपाल सक्सेना हे २००० सालापासून कायदेशीर लढाई लढत आहेत. तेव्हा मेधा पाटकर यांनी आपल्या नर्मदा बचाव आंदोलनाच्या विरोधात जाहिरात प्रसिद्ध केल्याप्रकरणी व्हीके सक्सेना यांच्याविरोधात खटला दाखल केला होता.

Medha Patkar
Film Actress : रेव्ह पार्टीत 'या' अभिनेत्रीसह 86 जणांनी ड्रग्स घेतल्याचे रक्ताच्या नमुन्यांवरून झाले स्पष्ट; पोलिस सूत्रांकडून माहिती

व्हीके सक्सेना हे त्यावेळी अहमदाबादस्थित एनजीओ नॅशनल कौन्सिल फॉर सिव्हिल लिबर्टीजचे प्रमुख होते. सक्सेना यांनी एका टीव्ही चॅनलवर आपल्या विरोधात अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल आणि बदनामीकारक प्रेस स्टेटमेंट जारी केल्याबद्दल दोन गुन्हे देखील दाखल केले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.