Video: मंत्र्याच्या गाडीवर चढून हल्ला; भाजपवर आरोप करत केजरीवाल म्हणाले...

आम आदमी पार्टीचे दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्यावर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याच्या दावा आपने केला आहे.
Attack
AttackSakal
Updated on

नवी दिल्ली : सध्या दिल्लीत महापालिका निवडणुकांची रणधुमाळी चालू असून एप्रिलमध्ये या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. दरम्यान सगळ्याच पक्षांनी आपापल्या पद्धतीने प्रचार करायला सुरुवात केली आहे. त्यातच आम आदमी पार्टीचे दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्यावर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याच्या दावा आपने केला आहे.

याबाबत आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट करत याबाबत माहीती दिली आहे. या ट्वीट मध्ये त्यांनी दिल्लीत भाजपा महापालिका निवडणुका हारत आहे. त्यामुळे त्यांचा हिंसा हा उत्तम मार्ग आहे, त्यांनी तो स्विकारला आहे. तसंच भाजपाच्या गुंडांनी आप मंत्र्याच्या ताफ्यावर हल्ला केला असल्याचं सांगत ट्वीट केलं आहे. त्या ट्वीटला रिप्लाय करत पक्षप्रमुख अरविंद केजरीवाल म्हणाले की, "हे भाजपा आहे. माफिया आणि गुंडांची पार्टी. जेव्हा हे हारत असतात तेव्हा हे आपली औकात दाखवतात. यांना जनता त्यांची औकात दाखवेल." अशा खोचक शब्दांत त्यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे.

दरम्यान या व्हिडिओत काही कार्यकर्ते एका गाडीवर चढलेले पहायला मिळत आहेत. त्यांच्याकडे कुठल्याही पक्षाचा झेंडा दिसत नाही. काही तरुणांच्या हातात काळ्या फिती दिसत आहेत. आणि हे कार्यकर्ते या मंत्र्याच्या DL12CB0001 अशी नंबर प्लेट असणाऱ्या गाडीच्या बोनेटवर चढून हा ताफा अडवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. यादरम्यान आपच्या अधिकृत ट्वीटरवरुन ही माहीती आणि व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. त्याला रिप्लाय करताना केजरीवाल यांनी भाजपावर टीका केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()