Delhi Service Bill: दिल्ली सेवा विधेयकावरुन राज्यसभेत प्रचंड गोंधळ; आता सोमवारीच लागणार निकाल

दिल्ली सेवा विधेयक काल लोकसभेत आवाजी मतदानानं मंजूर झालं. यानंतर आज ते राज्यसभेत मांडण्यात आलं आहे.
Rajya Sabha
Rajya Sabha
Updated on

नवी दिल्ली : दिल्ली सेवा विधेयकावरुन राज्यसभेत आज मोठा गदारोळ झाला. त्यामुळं राज्यसभा दिवसभरासाठी तहकूब झाली. यामुळं आज या विधेयकावर चर्चा होऊ शकली नाही. यानंतर आता थेट सोमवारी यावर चर्चा होणार आहे. (Delhi Service Bill 2023 huddle in Rajya Sabha house adjourned till Monday)

सभागृहात नेमकं काय घडलं?

लोकसभेत विधेयक मंजूर झाल्यानंतर आज ते राज्यसभेत मांडण्यात आलं. राज्यसभेत सरकारचं संख्याबळ हे काठावर असल्यानं इथं विधेयक मंजूर होण्यात अनेक अडचणी येणार आहेत. त्यातच आज राज्यसभेत विरोधकांचा जोरदार गोंधळ घातला. यानंतर सभापती जगदीप धनकड यांनी कामकाज तहकूब केलं. सोमवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत कामकाज तहकूब राहिलं असं त्यांनी जाहीर केलं. (Latest Marathi News)

Rajya Sabha
Fadnavis on Barsu: बंदी असलेल्या संघटनेकडून बारसू आंदोलनाला फंडिंग; फडणवीसांचा गंभीर आरोप

दरम्यान, राज्यसभेत विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे बोलायला उभे राहिल्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या खासदारांकडून गोंधळ सुरू झाला. खर्गे बोलताना आक्रमक झाले होते. त्यानंतर सुरुवातीला दुपारी 12 वाजेपर्यंत राज्यसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. त्यानंतर संपूर्ण दिवसभरासाठी कामकाज थांबवल. (Marathi Tajya Batmya)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()