नवी दिल्ली : दिल्ली सेवा अध्यादेशासंबंधीचं विधेयक काल चर्चेनंतर आवाजी मतदानानं लोकसभेत मंजूर झालं. त्यानंतर आज हे विधेयक राज्यसभेत मांडण्यात येणार आहे. लोकसभेत सरकारचं संख्याबळं मजबूत असल्यानं तिथं या विधेयकाला कुठलीही अडचण आली नाही. पण राज्यसभेत काहीशी काठावरची परिस्थिती आहे. राज्यसभेत सत्ताधारी NDA आणि विरोधक INDIA यांचं बलाबल कसं आहे? जाणून घेऊयात. (Delhi Services Bill 2023 Bill will be introduced in Rajya Sabha today Know NDA and INDIA Strength)
दिल्ली सेवा सुधारणा विधेयक-२०२३ हे राजधानी दिल्लीतील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि बदल्या यासंबंधीचे अधिकार दिल्ली सरकारचे की केंद्र सरकारचे? यासबंधीचं विधेयक आहे. यासंदर्भात दोन महिन्यांपूर्वी सुप्रीम कोर्टानं हे अधिकार दिल्ली सरकारचे असल्याचा निर्वाळा दिला होता.
पण सुप्रीम कोर्टाच्या या आदेशाला फिरवत हे अधिकार केंद्राकडं असतील असा अध्यादेश काढला होता. याच अध्यादेशाचं कायद्यात रुपांतर करण्यासाठी सरकारनं विधेयक आणलं आहे.
लोकसभेत मंजूर झाल्यानंतर आता राज्यसभेत ते मांडलं जाईल पण इथं सरकारची छोडी दमछाक होणार आहे. कारण राज्यसभेतील सध्याच्या एकूण खासदारांची संख्या 238 आहे. यांपैकी NDA (101) + BJD (9) = 110 तर INDIA आघाडीकडं - 100 मतं आहेत.
तसेच राष्ट्रपती नियुक्त 5 खासदार आणि इतर पक्षांचे 22 खासदार आहेत. यांपैकी या विधेयकाबाबत भूमिका स्पष्ट न केलेले पक्ष वायएसआर काँग्रेस आणि बीआरएस हे आहेत. या दोन्ही पक्षांचे राज्यसभेत अनुक्रमे ९ आणि ७ खासदार आहेत.
NDA सोबत - भाजप 92, बीजेडी 9.
INDIA सोबत - काँग्रेस 31, तृणमूल काँग्रेस 13, आम आदमी पक्ष 10, डीएमके 10, आरजेडी 6, सीपीआय 5, जनता दल युनायटेड 5, एआयडीएमके 4, राष्ट्रवादी काँग्रेस 4, शिवसेना (ठाकरे गट) 3, समाजवादी पक्ष 3.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.