Bomb Threat by Student: विद्यार्थ्यानंचं दिली शाळा बॉम्बनं उडवण्याची धमकी! दिल्लीतला धक्कादायक प्रकार; कारण ऐकून...

विद्यार्थ्यानं हा प्रकार केल्याची कबुली दिली असून नेमकं त्यानं काय केलं जाणून घ्या
Bomb Threat call
Bomb Threat call
Updated on

नवी दिल्ली : दिल्लीच्या ग्रेटर कैलास भागातील एका शाळेत बॉम्ब असल्याची धमकी देणारा ई-मेल या शाळेला प्राप्त झाला होता. या मेलनंतर एकच खळबळ उडाली होती. यानंतर शाळा प्रशासनानं तातडीनं शाळेला सुट्टी जाहीर केली. पण पोलिसांच्या तपासानंतर शाळेतीलच एका १४ वर्षीय विद्यार्थ्यानं हा धमकीचा ई-मेल केल्याचं समोर आलं आहे.

Bomb Threat call
Gold Price: सोन्याची चमक पुन्हा वाढू लागली; मोदी सरकार सोने महाग करण्याच्या तयारीत, काय आहे कारण?

ग्रेटर कैलासमध्ये घडला प्रकार

ग्रेटर कैलास १ येथील कैलास कॉलनीतील समर फील्ड स्कूलला शुक्रवारी धमकीचा ई-मेल प्राप्त झाला, ज्यामध्ये शाळा उडवून दिली जाईल, असा दावा करण्यात आला होता. खबरदारी उपाय म्हणून शाळा तातडीनं रिकामी करण्यात आली.

इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (IGI) विमानतळ आणि राष्ट्रीय राजधानीतील अनेक सरकारी रुग्णालयांमध्ये ई-मेलद्वारे बॉम्बच्या धमक्या नुकत्याच मिळाल्या होत्या, त्यामुळं दिल्ली पोलीस अलर्टवरच होते. त्यातच ग्रेडर कैलास येथील शाळेला धमकीचा ई-मेल मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी इथं कसून तपासणी केली, पण पोलिसांना कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.

Bomb Threat call
Taj Mahal Video : 'तेजोमहल' म्हणत ताजमहालात घुसले दोन तरुण, गंगाजल शिंपडून बनवला व्हिडीओ, CISF ने केली अटक

धमकीचा ई-मेल विद्यार्थ्यानं केला

दरम्यान, शाळेत बॉम्ब असलेल्या धमकीचा ई-मेल हा समर फील्ड स्कूल या शाळेतीलच एका १४ वर्षाच्या विद्यार्त्यानं केल्याचं पोलीस तपासात समोर आलं. दिल्ली पोलिसांनी संबंधित विद्यार्थ्याची ओळख पटवली असून सध्या त्याची चौकशी सुरू आहे. या विद्यार्थ्याने मेलमध्ये आणखी दोन शाळांचा उल्लेख केला होता कारण खरंच बॉम्ब असल्याचा बनाव खरा वाटावा, असंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

धमकीचा ई-मेल मागचं कारण आलं समोर

संबंधित विद्यार्थ्याकडून कसून चौकशी केल्यानंतर या विद्यार्थ्यानं आपण शाळेत बॉम्ब असल्याचा ई-मेल का केला? याचं कारण सांगितलं. या विद्यार्थ्याला त्या दिवशी शाळेत जायचं नव्हतं त्यामुळं त्यानं हा उपद्याप केल्याचं पोलिसांसमोर कबूल केलं. त्यामुळं ही केवळ अफवा होती हे स्पष्ट झालं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.