५१ लाखांचे अवैध चलन बाळगणाऱ्या प्रवाशाला दिल्लीत अटक

पंजाबमधील एक भारतीय नागरिक सोमवारी सौदी अरेबियासाठी विमानाने निघाला होता.
Arrest
ArrestANI
Updated on

नवी दिल्ली : सध्या कोरोनाच्या साथीमुळे परदेशी प्रवासावर बंधने आले आहेत. ओमिक्रॉनच्या भितीमुळे प्रवाशांना लसीकरण बंधनकारक केले असून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन केले जात आहे. अशातही प्रवाशांकडून अवैधरित्या चलन बाळगल्याच्या घटना घडत आहेत. (Traveller arrest by Delhi Police)

दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशी चलन बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केल्याची घटना घडली आहे. विमानतळावरील या प्रवाशाकडे जवळपास ५१ लाख रूपयांचे परदेशी चलन आढळून आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Arrest
अजब कारभार; फ्रीजमध्ये ठेवलेली लस टोचल्याने बालकांचा मृत्यू

पंजाबमधील एक भारतीय नागरिक सोमवारी सौदी अरेबियासाठी विमानाने निघाला होता. इंदिरा गांधी विमानतळाच्या ३ क्रमांकाच्या टर्मिनलवरुन जात असताना सिमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांचे त्याच्याकडे लक्ष गेले आणि त्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्याचे सिमाशुल्क विभागाचे अतिरिक्त आयुक्त शौकत अली नुरवी यांनी सांगितले.

दरम्यान अधिकाऱ्यांनी त्याच्याकडील चलन तात्काळ जप्त केले असून मोजल्यानंतर त्या चलनाची किंमत ६९२०० अमेरिकन डॉलर एवढी असून भारतीय चलनानुसार त्याची किंमत ५०९६५८० रुपये एवढी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

तसेच सदर व्यक्तीला अटक केली असून त्याच्यावर कलम ११० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासणी चालू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.