Supreme Court: ''मतदान घ्या पण निकाल जाहीर करु नका!'', खर्चाची उधळपट्टी अन् विद्रुपीकरणानंतर कोर्टाच्या सूचना

University Election: दिल्ली विद्यापीठाच्या निवडणुकीदरम्यान उमेदवारांकडून आणि त्यांच्या समर्थकांकडून विद्यापीठातील वर्गांचे, येथील परिसराचे आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्याप्रमाणात विद्रुपीकरण आणि नुकसान करण्यात आले आहे. याविरोधात प्रशांत मनचंदा यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
Supreme Court
Supreme Courtesakal
Updated on

नवी दिल्ली,ः ‘‘निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव आहे, पैशांची वारेमाप उधळपट्टी करण्याची आणि भ्रष्टाचार करण्याची संधी नाही,’’ अशा शब्दांत दिल्ली उच्च न्यायालयाने विद्यार्थी संघटनांना फटकारले आहे. दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकी दरम्यान विद्यार्थ्यांकडून झालेल्या विद्रुपीकरणाविरोधात आणि पैशांच्या उधळपट्टीविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने बुधवारी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
‘‘विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकीदरम्यान सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण आणि नुकसान आम्ही छायाचित्रांच्या माध्यमातून पाहिले आहे. ही परिस्थिती देशातील सार्वत्रिक निवडणुकांपेक्षा वरताण होती,’’ असे निरिक्षण न्यायालयाने नोंदविले आहे.

‘नाहीतर निवडणूकच रद्द करा’
एक तर विद्यापीठाने २७ सप्टेंबर रोजी होणारी निवडणूक रद्द करावी किंवा मग उमेदवारी प्रक्रिया नव्याने सुरू करावी आणि हे करणे शक्य नसेल तर मतदान होऊ द्यावे पण जोपर्यंत सार्वजनिक मालमत्तेचे झालेले विद्रुपीकरण आणि नुकसान भरून दिले जात नाही तोवर निकाल जाहीर करू नये, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने प्रशासनाला दिली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी गुरुवारी होणार आहे. त्याचप्रमाणे यापुढे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि विद्रुपीकरण होऊ नये यासाठी आणि जे नुकसान झाले आहे त्याची भरपाई करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी, विद्यापीठ प्रशासन, महापालिका प्रशासन आणि दिल्ली मेट्रो यांच्यासह योग्य त्या उपाययोजना कराव्यात असा आदेशही न्यायालयाने दिला आहे.

अडाण्यांसारखे वागू नका


‘‘निवडणूक प्रक्रिया ही युवापीढीला भ्रष्ट करण्यासाठी नाही; जिथे ही घेण्यात येत आहे ते स्थान ज्ञानार्जनाचे आहे, मात्र ज्या पद्धतीने सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण आणि नुकसान करण्यात आले आहे, त्यावरून या हे वर्तन अडाण्यांचे असावे असे वाटते. दिल्ली विद्यापीठ काहीही कारवाई करताना दिसत नाही. संबंधितांवर कठोर कारवाई करा म्हणजे अशा पद्धतीने सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करून आपण पळून जाऊ शकत नाही याची त्यांना जाणीव होईल,’’ असे आदेश न्यायालयाने दिले. या प्रकरणी कुलगुरूंनी तातडीने बैठक बोलवावी असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

Supreme Court
BJP News: भाजप नेता हवालदिल! पैसे, दागिने घेऊन बायको प्रियकरासोबत फरार

याचिकाकर्त्यांचे म्हणणे


दिल्ली विद्यापीठाच्या निवडणुकीदरम्यान उमेदवारांकडून आणि त्यांच्या समर्थकांकडून विद्यापीठातील वर्गांचे, येथील परिसराचे आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्याप्रमाणात विद्रुपीकरण आणि नुकसान करण्यात आले आहे. याविरोधात प्रशांत मनचंदा यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. वर्गांसह विद्यापीठ परिसराचे आणि सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण करण्यात ज्यांचा सहभाग आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. त्याचप्रमाणे संबंधित उमेदवारांच्या पक्षांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश द्यावेत अशी मागणीही याचिकाकर्त्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.