Delhi : भाजपला रोखण्यासाठी नितीश कुमारांची मोठी खेळी; राहुल गांधींनंतर येचुरींची घेतली भेट

देशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे.
Delhi Visit CM Nitish Kumar met CPI leader Sitaram Yechury
Delhi Visit CM Nitish Kumar met CPI leader Sitaram Yechuryesakal
Updated on
Summary

देशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे.

CM Nitish Kumar : देशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar) यांनी भाजपची साथ सोडून लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या RJD पक्षासोबती युती केली. ते आता विरोधी गटात सामील झाले आहेत. सध्या नितीश कुमार दिल्लीच्या दौऱ्यावर असून ते भाजपविरोधी (BJP) विविध पक्षांच्या नेत्यांची भेट घेत आहेत.

नितीश कुमार यांनी मंगळवारी डाव्या पक्षातील सीपीआयचे (एम) महासचिव सीताराम येचुरी (Sitaram Yechury) यांची भेट घेतली. बिहारमध्ये भाजपविरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे. तसाच प्रयत्न देशपातळीवरही झाला पाहिजे. त्यासाठी जास्तीत-जास्त विरोधी पक्ष एकत्र आले, तर भाजपविरोधी आघाडी अधिक बळकट होईल, असं त्यांचं मत आहे. नितीश कुमार सोमवारी दिल्लीत पोहचले होते. त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि जनता दल सेक्युलरचे प्रमुख कुमार स्वामी यांचीही भेट घेतली. त्यांनी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला शुभेच्छा दिल्या.

Delhi Visit CM Nitish Kumar met CPI leader Sitaram Yechury
Arvind Giri : पाच वेळा आमदार राहिलेल्या भाजपच्या अरविंद गिरींचं चालत्या गाडीतच निधन

पंतप्रधान बनण्याची इच्छा नाही : नितीश कुमार

नितीश कुमार यांनी सीताराम येचुरी यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आम्ही आता एकत्र असल्याने मी दिल्लीत आलो आहे. सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं नितीश कुमार म्हणाले. आमची सर्वांशी चर्चा सुरू आहे. डावे पक्ष, विविध राज्यातील प्रादेशिक पक्ष आणि काँग्रेस एकत्र आले तर भाजपविरोधात मोठी आघाडी उभी राहील, ही मोठी गोष्ट असेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. भाजपिरोधी पक्षांना एकत्र आणणं, हाच आपला हेतू आहे. पंतप्रधान बनण्याची आपली इच्छा नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Delhi Visit CM Nitish Kumar met CPI leader Sitaram Yechury
'लव्ह जिहाद'च्या कचाट्यात कुणी सापडलं असेल, त्यांनी आमच्याशी संपर्क करा : नवनीत राणा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()