दिल्ली : उत्तर भारतात पावसाने कहर केला असून यमुनेच्या काठावर वसलेल्या गावात पुराचे पाणी घुसले आहे. यामुळे अनेक नागरिकांचे संसार उघड्यावर आले आहेत. तर घरे, गुरे वाहून गेल्याच्या घटना आहेत. पुराच्या पाण्याच्या आणि घरे वाहिल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
पुरामुळे यमुनेच्या पाणीपातळीत वाढ झाली असून अनेक घरे पुराच्या पाण्यात पूर्णपणे बुडाले आहेत. एनडीआरएफ जवानांकडून अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तर काही लोकं घराच्या पत्र्यावर जाऊन बसलेले दिसत आहेत.
दरम्यान, यमुनेच्या प्रलयामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झालेत. या पुरामध्ये गावच्या गावं पाण्याखाली गेले असून पुराचा मोठा फटका शेती आणि नागरिकांना बसलाय. डोळ्यांसमोर सोन्यासारखे जनावरे वाहून जाताना शेतकऱ्यांना पाहावे लागत आहेत. काहीजण आपला जीव धोक्यात घालून जनावरांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. या नुकसानीमुळे नागरिकांच्या डोळ्यात अश्रू तरळले आहेत. या घटनेचे हृदय पिळवटून टाकणारे व्हिडिओ समोर आले आहेत.
काही ठिकाणी जवानांना मदत पोहोचवणे शक्य नसल्यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कुणीही आमच्या मदतीसाठी आलं नाही असं म्हणत नागरिकांच्या डोळ्यात अश्रू तरळताना दिसत आहे. नोएडा पोलिसांनी २ गोशाळेतून जवळपास २७० गायींना वाचवण्यात आलं आहे.
हिमाचलमध्येही पावसाच्या पुराने कहर केलाय. पर्यटकांच्या गाड्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या असून अनेक घरे, इमारती, दुकाने, रस्ते वाहून गेले आहेत. व्यास नदीवरील पुलही कोसळला असून पर्यटनासाठी गेलेले पर्यटक अडकून पडले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.