लस आणि इम्युनिटीला डेल्टा प्लस देतोय हुलकावणी? तज्ज्ञांचा दावा

CORONA
CORONA
Updated on

नवी दिल्ली- देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. असे असले तरी कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरियंटने चिंता वाढवली आहे. कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटनमुळे (B.1.617.2) धोका वाढला आहे. त्यातच आता कोरोनाच्या नवा व्हेरियंटचा म्युटेशन डेल्टा प्लस AY.01 मोठ्या प्रमाणात पसरत आहे. तज्ज्ञांनी असा इशारा दिलाय की, डेल्टा प्लस व्हेरियंट लस आणि इंफेक्शन इम्युनिटीला हुलकावणी देऊ शकतो. (delta plus variant vaccines antibodies and infection immunity)

भारताचे प्रमुख वायरोलॉजिस्ट आणि INSACOG चे माजी सदस्य प्रोफेसर शाहीद जमील यांनी म्हटलंय की, डेल्टा प्लस व्हेरियंट इम्युनिटी आणि लस यासोबतच इंफेक्सनमुळे विकसित झालेल्या इम्युनिटीला चकवा देण्याची शक्यता आहे. प्रोफेसर जमील म्हणाले की, डेल्टा प्लसमध्ये ते सर्व लक्षणं आहेत जे मूळ डेल्टा व्हेरियंटमध्ये होते. याशिवाय K417N नावाचा म्युटेशन जो दक्षिण आफ्रिकेतील बीटा व्हेरियंटमध्ये आढळला होता, त्याचेही लक्षणंही यात आहेत.

CORONA
जास्त मुलांना जन्म द्या, 1 लाख रुपये मिळवा; मंत्र्याची घोषणा

आपल्याला माहीतेय की, लशीचा प्रभाव बीटा व्हेरियंटवर कमी प्रमाणात होता. बीटा व्हेरियंट लशीला हुलकावणी देण्यात अल्फा आणि डेल्टा व्हेरियंटपेक्षाही अधिक चालाख आहे. दक्षिण आफ्रिकेच्या सरकारने अॅस्ट्राझेनेकाच्या लशीची खेप परत केली होती. लस स्थानिक व्हेरियंटविरोधात प्रभावी नसल्याचे कारण दक्षिण आफ्रिका सरकारने दिले होते, असं प्रोफेसर जमील म्हणाले.

CORONA
डेल्टा प्लस व्हेरियंटचे राज्यात 21 रुग्ण; सहा जिल्ह्यांत शिरकाव

प्रोफेसर जमील पुढे म्हणाले की, डेल्टा प्लस व्हेरियंट अधिक संक्रामक असल्याचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. तसेच भारतात मोठ्या संख्येने डेल्टा प्लसचे रुग्ण सापडलेले नाहीत. मोठ्या प्रमाणात सिक्वेंसिंग करण्यात आल्यास देशातील डेल्टा प्लस संक्रमणाची माहिती मिळू शकेल. दरम्यान, देशातील डेल्टा प्लस व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रात करण्यात आलेल्या 7 हजार 500 जिनोम सिक्वेंसिंगपैकी 21 रुग्ण डेल्टा प्लस व्हेरियंटचे आढळून आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.