दिल्लीचे मुख्य सचिव नरेश कुमार यांना पदावरुन हटवण्याची मागणी; चौकशी अहवाल नायब राज्यपालांकडे सादर

Arvind Kejriwal
Arvind KejriwalSakal
Updated on

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्य सचिव नरेश कुमार यांनी आपल्या पदाचा वापर करून त्यांचा मुलगा भागीदार असलेली कंपनी मेटामिक्स आणि द इन्स्टिट्यूट ऑफ लिव्हर अँड बिलीरी सायन्सेस (आयएलबीएस) हॉस्पिटल यांच्यात सामंजस्य करार केल्याचा आरोप आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या दक्षता मंत्री आतिशी यांनी चौकशी केलेल्या चौकशीचा अहवाल नायब राज्यपाल व्ही.के. सक्सेना यांना शनिवारी सादर केला. तसेच नरेशकुमार यांना पदावरून हटविण्याची मागणीही केली.

केजरीवाल यांना आतिशी यांचा अहवाल गुरुवारी प्राप्त झाला, ज्यात कुमार यांच्या निलंबनाची आणि या प्रकरणातील सीबीआय चौकशीची शिफारस करण्यात आली होती. मुख्य सचिवांच्या सूत्रांनी आरोप नाकारले असून नरेश कुमार यांचा मुलगा आणि 'आयएलबीएस' यांच्यातील कोणत्याही सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली नाही, असा दावा केला आहे. तो समभागधारक किंवा संचालक किंवा भागीदार किंवा कर्मचारी म्हणून वादग्रस्त कंपनीशी अजिबात जोडलेला नाही, असे म्हटले आहे. 'आयएलबीएस' ने सुद्धा आरोप पूर्णपणे निराधार असल्याचे सांगत नाकारले.

Arvind Kejriwal
MP Assembly Election: चर्चा एकच... सरकार कोणाचं! अटीतटीमुळे कोणालाही अंदाज येईना...

काय आरोप होते?

२४ जानेवारी २०२३ रोजी 'आयएलबीएस' आणि मुख्य सचिवांच्या मुलाच्या कंपनीमध्ये सामंजस्य करार झाला होता, असा आरोप आतिशी यांनी अहवालात केला असून 'आयएलबीएस' सोबत कृत्रिम बुद्धिमत्ता सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करार मिळवण्यासाठी नरेशकुमार यांनी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप केल्याचे म्हटले आहे. प्राथमिकदृष्ट्या असे दिसते की नरेश कुमार यांनी अखिल भारतीय सेवा आचार नियमांचे उल्लंघन केले आहे. सार्वजनिक तिजोरीचे नुकसान करून मुलाच्या कंपनीसाठी फायदेशीर सहयोग सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले आहेत, असे अहवालात म्हटले आहे.

Arvind Kejriwal
S Venkitaramanan Passed Away: RBIचे माजी गव्हर्नर एस वेंकटरमणन यांचे दीर्घ आजाराने निधन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.