Video: 'कोंबडी अन् क्वार्टर'मध्ये लोकशाही 'ओके'च; TRS नेत्याचा व्हिडीओ व्हायरल

chicken and quarter news in Marathi
chicken and quarter news in Marathi
Updated on

हैदराबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या राष्ट्रीय पक्षाच्या लाँचच्या आधी मंगळवारी टीआरएस नेत्याने वारंगलमधील काही स्थानिक लोकांना एक दारुची बाटली अन् जिवंत कोंबडीचे वाटप केले. टीआरएस पक्षाच्या नेत्याने मुख्यमंत्री केसीआर आणि त्यांचा मुलगा केटी रामाराव यांच्या मोठमोठ्या कट-आउटखाली हे वाटप केलं. याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

टीआरएसचे स्थानिक नेते राजनाला श्रीहरी यांनी वारंगलमध्ये लोकांना जिवंत कोंबडी आणि दारूच्या बाटल्यांचे वाटप केले. बहुतेक लोक श्रीहरींकडून भेटवस्तू घेण्यासाठी रांगेत उभे दिसत होते. KCR यांच्या भारतीय राष्ट्र समितीचं (BRS) लाँचिंग करण्यात आलं आहे. याचा आनंद साजरा करताना श्रीहरी म्हणाले की, त्यांना केसीआर यांना पंतप्रधान आणि केटीआर यांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचे आहे.

भेटवस्तू वाटपाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, विरोधकांनी टीआरएसचा चांगलाच समाचार घेतला. नेटकऱ्यांनीही टीआरएस नेत्याच्या कृत्याचा निषेध केला आहे. सोशल मीडियावर लोक कमेंट करून बीआरएसला 'बोटल राष्ट्र समिती' असं म्हटलं आहे. तर तेलंगणा काँग्रेसने म्हटले की, बीआरएसचे निवडणूक चिन्ह 'कार'ऐवजी क्वार्टर असावे.

निवृत्त आयएएस अधिकारी प्रताप सिंग यांनी व्हिडीओ ट्विट करत म्हटलं की, एक क्वार्टर आणि कोंबडीच्या मोबदल्यात विकली लोकशाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.